शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

Phaltan Doctor Death: गोपाळ बदनेने 'दबंग' अधिकारी होण्याच्या अट्टाहासापायी केले अनेक कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:36 IST

सोलापुरात विनयभंगाची तक्रार

विकास शिंदेफलटण : फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचा एक दबंग पोलिस अधिकारी अशी स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने अनेक कारनामे केल्याचे समोर येत आहे. त्याने पोलिस स्टेशनला साखर कारखान्यांचे वसुली केंद्र बनविले, तो नागरिकांशी रस्त्यावर हुज्जत घालतो, तसेच तो पोलिसांचे सिंडिकेट चालवत असल्याच्या आरोपांचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.फलटण येथील पीडिता महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर फलटण ग्रामीणचा पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यामुळे आरोपी म्हणून बदने याला अटक झाली. त्यानिमित्ताने त्याने यापूर्वीही केलेले एक-एक कारनामे पुढे येऊ लागले आहेत. एका महिलेने पीएसआय बदने याने आमच्या वडिलांना त्रास दिला. त्यानंतर आम्हालाही तोच अनुभव असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांकडे केला.

वाचा : ‘त्या’ महिला डॉक्टरच्या डायरीत ८४ अन् सरकारी दप्तरी ३६ नोंदी, शवविच्छेदन अहवालातील नोंदीत तफावत

सोलापुरात विनयभंगाची तक्रारगोपाळ बदने हा २०१३ मध्ये सोलापूर शहर पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाला होता. तो खात्याअंतर्गत परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला. दरम्यान, तो येथे शिपाई असताना त्याने जातिवाचक शिवीगाळ करत विनयभंग केल्याची तक्रार नोंदविली होती. या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांचे सिंडिकेट चालवायचाबदने हा फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे सर्व व्यवहार पाहत होता. एका अर्थाने तो पोलिसांचे सिंडिकेट चालवत होता. पीएसआय बदने सगळ्या प्रकारची देवाणघेवाण पाहत असल्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये त्याचा रुबाब होता, असे त्याच्या खात्यातील काही कर्मचारी सांगतात.

कौतुक अन् संबंधही...गांजा तस्करी करत असलेली गाडी त्याने पकडली होती. हातापायांची सालटे निघाली, तरी त्याने गुन्हेगार सोडले नव्हते. त्याच्या कौतुक सोहळ्याला स्वतः एसपी समीर शेख हजर होते. या प्रकरणाची दुसरी बाजू दबक्या आवाजात बोलली जाते. गांजा तस्करांवरील कारवाईबद्दल त्यांचे कौतुक होते; तसेच बदनेचे त्यांच्याशी संबंधही असल्याचे बोलले जाते.

गाड्या अडवून तपासणी करायचाफलटणच्या समाजमाध्यमांवर बदनेचे अनेक व्हिडीओ फिरत आहेत. त्यांपैकी एक व्हिडीओ तो सिव्हिल ड्रेसमध्ये असताना आणि वाहतूक पोलिसाची जबाबदारी नसताना गाड्या अडवून त्यांची तपासणी करण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी संबंधित चालकाने त्याला चांगलेच धारेवर धरले होते. तिथून त्याने पळ काढल्याचे स्पष्ट दिसत आहे

English
हिंदी सारांश
Web Title : Phaltan Doctor Death: Gopal Badne's Crimes in Pursuit of Power

Web Summary : PSI Gopal Badne, accused in a doctor's suicide, faces prior misconduct allegations, including harassment and running a police syndicate. He allegedly misused his authority, turning the station into a recovery center. A past complaint of molestation in Solapur has also surfaced.