शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पीओपी मूर्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका, बंदीबाबत राज्य शासनाकडून दिखावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 18:46 IST

सातारा : राज्य शासनाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीबाबत केवळ दिखावा केला जात असून, कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. ...

सातारा : राज्य शासनाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीबाबत केवळ दिखावा केला जात असून, कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. परिणामी पर्यावरणप्रेमी गणेशमूर्तिकार देशोधडीला लागले आहेत. याप्रकरणी राज्यासह सातारा जिल्ह्यातील मूर्तिकारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती श्री संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला संस्थेचे मारुती कुंभार यांनी दिली.महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये काही विकृती निर्माण झाल्या आहेत. याची सुरुवात गणेशमूर्तींच्या निर्मितीपासून होते. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने १२ मे २०२० पासून देशभरात प्रदूषणकारी प्लास्टर ऑफ पॅरीसपासून मूर्तींचे उत्पादन, साठवणूक, विक्री, आदींवर बंदी घातलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही २०२१ साली ही बंदी कायम केली असताना, आजही बाजारात विक्रीस उपलब्ध असणाऱ्या ९० टक्के मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिस निर्मित आहेत. पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तींबाबत गेली दोन दशके पर्यावरण संस्था सातत्याने समाज प्रबोधन करत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आज ग्राहक सजग झाला असून, मातीच्या मूर्तींबाबत आग्रही आहे; परंतु बाजारात गेल्यावर ग्राहकाकडे प्लास्टर ऑफ पॅरिसचाच पर्याय उपलब्ध आहे.

दरवर्षी गणेशोत्सव जवळ येताच राज्य सरकार पीओपी बंदीबाबत केवळ दिखावा करत असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नाही. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे आज पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनविणारे पारंपरिक मूर्तिकार देशोधडीला लागले असून, जलीय जैवविविधता प्रचंड वेगाने उद्ध्वस्त होते आहे. या सर्व मुद्द्यांबाबत राज्यातील विविध जिल्ह्यांतील पर्यावरण कार्यकर्ते व पारंपरिक मूर्तिकारांनी एकत्र येत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करणे, नियम मोडणाऱ्या मूर्तिकार, विक्रेते यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करणे, जिल्हास्तरीय समित्या नेमून त्यांच्यामार्फत अंमलबजावणीची देखरेख ठेवणे अशा प्रमुख मागण्या या याचिकेत केल्या आहेत. दि. ३१ जुलै रोजी याचिकेची प्रथम सुनावणी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्यासमोर झाली असून, याचिकाकर्त्यांचे म्हणणे गांभीर्यपूर्वक ऐकून सर्व प्रतिवादींना त्यांचे म्हणणे तीन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मारुती कुंभार यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGanesh Mahotsavगणेशोत्सव