शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

सातारा पालिकेतील विरोधक एकवटले, सत्ताधाऱ्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:03 IST

विरोधकांची मते डावलून व कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावरील सर्व विषय बहुमताने मंजूर केले. हा अजेंडा रद्द करण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरोधात जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती नगरविकास आघाडी व भाजप नगरसेवकांनी दिली.

ठळक मुद्देसातारा पालिकेतील विरोधक एकवटलेसत्ताधाऱ्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणारसभेत अपशब्द वापरल्याने कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सातारा : विरोधकांची मते डावलून व कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावरील सर्व विषय बहुमताने मंजूर केले. सातारा शहराच्या विकासासाठी ही बाब निंदनीय आहे.नगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कधीही असा प्रसंग घडला नाही. हा अजेंडा रद्द करण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरोधात जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती नगरविकास आघाडी व भाजप नगरसेवकांनी दिली. दरम्यान, भाजप व नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेत अपशब्द वापरल्याने कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आले.

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी विरोधात सभागृहाबाहेर बैठक मारली. अखेर पोलीस बंदोबस्तात ही सभा सुरू करावी लागली.

सभेला सुरुवात झाल्यानंतर अजेंड्यातील विषय का बदलले गेले, यासह अनेक प्रश्न विरोधी पक्ष नेते अशोक मोने, नगरसेवक अमोल मोहिते, भाजप नगरसेवक विजय काटवटे, सिद्धी पवार व आशा पंडित यांनी उपस्थित करून सभेत गोंधळ घातला.मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. अखेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने सत्ताधाऱ्यांनी विषयपत्रिकेतील सर्वच विषय मंजूर करावे, अशी मागणी सभाध्यक्षांपुढे लावून धरली. अखेर नगराध्यक्षांनी सर्व अठरा विषयांना मंजुरी देऊन पंधरा मिनिटांतच सभा आटोपती घेतली.

दरम्यान, सभा संपल्यानंतर भाजप व नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेत अपशब्द वापरल्याने पालिकेतील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.दरम्यान, सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा समाचार घेतला. नगरसेवक अशोक मोने म्हणाले, केवळ आपले हितसंबंध जोपासण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणतीही चर्चा न करता सर्व विषय बहुमताने मंजूर केले.

शहरातील विकासकामांवर चर्चा होणे अपेक्षित असताना त्यांनी बहुमताचा वापर करून विरोधकांना डावलण्याचा प्रयत्न केला. दहशत माजवण्याची आणि एकमताने विषय मंजूर करायचे, ही सत्ताधाऱ्यांची नीती आता खपवून घेतली जाणार नाही. आमचे विचार मांडायलासंधी मिळत नसेल तर सभा कशासाठी घ्यायची. हा अजेंडा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे तसेच न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका