साताऱ्यात बोगस नळ कनेक्शनला लोकप्रतिनिधींचा आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 04:39 AM2020-03-02T04:39:29+5:302020-03-02T04:39:35+5:30

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शब्दावर आणि सत्तेच्या जोरावर साताºयात मोठ्या प्रमाणात बोगस नळ कनेक्शन देण्यात आली आहेत.

People's dependence on bogus tap connection in Satara | साताऱ्यात बोगस नळ कनेक्शनला लोकप्रतिनिधींचा आश्रय

साताऱ्यात बोगस नळ कनेक्शनला लोकप्रतिनिधींचा आश्रय

Next

प्रगती जाधव-पाटील
सातारा : स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शब्दावर आणि सत्तेच्या जोरावर साताºयात मोठ्या प्रमाणात बोगस नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. यामुळे लाखोंच्या महसुलावर पाणी फिरत आहे. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेला दंडात्मक कारवाईचाही आधार घ्यावा लागत आहे.
सातारा शहराला नगरपालिकेकडून कास, शहापूर या योजनांमधून, तर काही भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. पालिकेच्या पुरवठ्याची पाणीपट्टी वार्षिक, तर प्राधिकरण महिन्याला पाण्याचे बिल आकारते. साताºयात गळतीच्या तक्रारी अत्यल्प आहेत; पण बोगस नळ कनेक्शनच्या आधारे होणारी पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात आढळते. याविषयी पालिका अधिकाऱ्यांनी कोणावर कारवाईचा बडगा उगारलाच, तर संबंधित अधिकाºयावर दबाव आणण्याचेही प्रकार घडले आहेत. साताºयात पालिकेच्या नोंदीनुसार १ लाख २० हजार १९५ लोकसंख्येसाठी १५ हजार ४००, तर प्राधिकरणाने १८ हजार १३६ नळ कनेक्शन दिल्याची नोंद आहे. पालिकेमार्फत १३ लाख लिटर, तर जीवन प्राधिकरणमार्फत रोज २५ लाख लिटर, असे एकूण ३८ लाख लिटर पाण्याचे वितरण करण्यात येते. जीवन प्राधिकरणने केलेल्या तपासणीत सुमारे
एक हजार कनेक्शन बोगस
असल्याचे समोर आले आहे. यापैकी काहींवरच कारवाई झाली.
(समाप्त)
>पालिकेच्या दप्तरी नोंदच नाही : पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गतवर्षी पाणी व घरपट्टीची स्वतंत्र आकारणी सुरू केली. त्यामुळे एकूण मागणी किती, थकबाकी किती, वसुली किती, याची नोंद अद्याप करण्यात आली नाही.
>शिवाय प्रतिलिटर पाण्यासाठी किती खर्च येतो, किती बोगस कनेक्शनवर कारवाई करण्यात आली, याचीही माहिती उपलब्ध नाही.
>सातारा पालिका पाणीपुरवठ्याचे काम योग्य पद्धतीने करीत आहे. करवसुलीचे कामही सुरू आहे. बोगस नळकनेक्शचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. - यशोधन नारकर, सभापती, पाणीपुरवठा
>सातारा शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेची पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली आहे. शहरात बोगस कनेक्शनही प्रचंड आहेत. याला जबाबदार कोणाला धरायचे. - सुधीर सुकाळे, अध्यक्ष, ड्रोंगो

Web Title: People's dependence on bogus tap connection in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.