शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

Lok Sabha Election 2019 सत्ताधाऱ्यांना जनता माफ करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:12 IST

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य ...

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य जनतेचा सत्यानाश, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खोटी आश्वासने देऊन तरुणांना देशोधडीला लावणाºया मोदी सरकारला जनता कदापिही माफ करणार नाही,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.वाई येथील साठे धर्मशाळेत काँग्रेसच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, विकास शिंदे, प्रतापराव देशमुख, व्याजवाडीचे माजी सरपंच संतोषराव पिसाळ, मानसिंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, महिला तालुकाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस मंजिरी पानसे, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे, वाई पंचायत समिती माजी सभापती सुनीता शिंदे, भाऊसाहेब शेळके, अतुल पवार, गुरुदेव बरदाडे, अजय धायगुडे, प्रदीप जायगुडे, विजयराव भिलारे, मुन्नाभाई वारुंगकर, मदन ननावरे, रवींद्र भिलारे, जयदीप शिंदे, विक्रम वाघ, विलास पिसाळ, सदाशिव अनपट उपस्थित होते.उदयनराजे भोसले म्हणाले, ‘लोकसभेची निवडणूक वाई विधानसभा मतदार संघाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. मोदी सरकारने एक रुपयाचाही निधी सातारा जिल्ह्याला दिला नाही. उलट शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देऊन शेतकरीच उद्ध्वस्त केला. देशात तरुणांची बेरोजगारी वाढली आहे.’पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शेतकºयांच्या खोट्या विकासाच्या नावाखाली मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार मोदी सरकारला नाही. त्यांनी केलेल्या नतभ्रष्ट कारभाराचा जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नाही.’प्रदीप जायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप शिंदे यांनी आभार मानले.विरोध करणाºयांनी आमदार होऊन दाखवावेकिसन वीर कारखाना वाचविण्यासाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मदन भोसले यांनी तालुक्यातील काँग्रेस संपविण्याची भाषा बोलत ‘टोलनाक्यावर जाणारे नकोत, संसदेत जाणारे उमेदवार हवेत,’ अशी टीका केली. भाजपमध्ये आमदार होऊन दाखवा, मगच खालच्या पातळीवर जाऊन टीका करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम मार्गी लावता आले नाही. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका विकास शिंदे यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक