शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मयूरचा काटा बदनामीच्या भीतीने

By admin | Updated: June 14, 2014 01:36 IST

मास्टरमाइंड गजाआड : सहा महिन्यांपूर्वीच करायचा होता खून

कऱ्हाड : शहरातील सोमवार पेठेत राहणाऱ्या मयूर गोरे या युवकाचा खून बदनामीच्या भीतीमुळे करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी वैभव रमेश माने (वय २५, रा. सत्यजित अपार्टमेंट कार्वेनाका, कऱ्हाड) या मुख्य सूत्रधारास कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. निकटवर्तीय महिलेशी विवाहापूर्वी असलेली मयूरची मैत्री भविष्यात बदनामीकारक ठरेल, अशी भीती वैभवला होती. त्यामुळेच त्याने मयूरचा खून करविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली. जखिणवाडी येथे काही दिवसांपूर्वी मयूर गोरे या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. हल्लेखोरांनी पिग्मीचे खाते काढायचे असल्याचे सांगून मयूरला भेटण्यासाठी जखिणवाडीत बोलवले होते. मयूर आपला मावसभाऊ सिद्धार्थला सोबत घेऊन दुचाकीवरून जखिणवाडीत गेला असताना पाणंद रस्त्यावर हल्लेखोरांनी मयूर व सिद्धार्थवर कोयत्याने हल्ला केला. बचावासाठी सिद्धार्थ नजीकच्या उसाच्या शेतात पळाला तर मयूर रस्त्याच्या दिशेने धावला. हल्लेखोरांनी भरवस्तीत मयूरला गाठून त्याच्या डोक्यात खोऱ्याचा आघात केला. त्यानंतर पिस्तुलातून मयूरवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात मयूरचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झाली तरी त्यांच्यापर्यंत पोहोचणे व खुनाची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान बनले होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलिसांची वेगवेगळी तीन पथके नेमली. या पथकांकडून प्रकरणाचा तपास केला जात होता. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन जगताप, उपनिरीक्षक रमेश गर्जे यांच्याकडून प्रकरणाचा कसून तपास केला जात असताना या प्रकरणाचा मास्टरमाइंड वैभव माने पोलिसांच्या हाती लागला. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी वैभव माने याला अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील इतर संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. इतर संशयित लवकरच हाती लागतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)