शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाटणच्या मतदारांचा कौल भूमिपुत्राला का राजेंना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:41 IST

अरुण पवार । लोकमत न्यूज नेटवर्क पाटण : पाटण विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले असले तरी ...

अरुण पवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : पाटण विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले असले तरी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना ‘फाईट’ देणारा उमेदवार म्हणून पाटणच्या नरेंद्र पाटील यांना भूमिपुत्र म्हणून पाटण तालुक्यातून जादा मताधिक्य मिळणार, असे संकेत मतदान पार पडल्यानंतर दिसून येत आहेत.पाटण मतदार संघात ३९७ मतदान केंद्रावर सरासरी ६० टक्के मतदान झाले. कºहाड तालुक्यातील तांबवे, साजूर, केसे, पाडळी, वसंतगड, साकुर्डी येथील मतदान केंद्राचा पाटण विधानसभा मतदार संघात समावेश होता. पाटण तालुक्यात आमदार शंभूराज देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर या दोन गटांचे प्राबल्य आहे. शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या नरेंद्र पाटील यांना पाटणचे शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांची पूर्णपणे साथ मिळाल्याचे चित्र मतदानाविषयी दिसले. याउलट राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी पाटणला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणावे तितक्या उत्साहात दिसून आले नाहीत. त्यातच सध्या यात्रा, लग्न सराई यांचा सिझन असल्यामुळे मुंबई आणि पुणे येथील तरुण युवक वर्ग मोठ्या संख्येने पाटण तालुक्यात उपस्थित आहे.मुंबईकर हे साहजिकच शिवसेनेकडे आकर्षित असल्यामुळे नरेंद्र पाटील यांना अशा तरुणांचा मतदानासाठी फायदा झाला असल्याचे दिसते. पाटण शहरात सुमारे १५ हजार मतदान आहे. येथे झालेल्या मतदानापैकी बहुतांशी मतदान उदयनराजे भोसले यांच्या पारड्यात पडेल. मात्र, कोयनानगर, मोरगिरी, ढेबेवाडी आणि मल्हारपेठ या विभागातील मतदान केंद्रावर शिवसेनेच्या उमेदवारास जादा पंसती मिळणार असल्याचे चित्र दिसून आले. कारण वरील विभागात आमदार शंभूराज देसाई आणि शिवसेना, भाजप असे समीकरण नरेंद्र पाटील यांना लाभदायक ठरणार आहे.ढेबेवाडी, कुंभारगाव, सणबूर, तळमावले या परिसरात शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनाच मतदार सहानुभूती दाखवतील, असे वातावरण मतदानादिवशी पाहावयास मिळाले. बंधू रमेश पाटील हे जरी नरेंद्र पाटील यांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहावयास मिळाले तरी नरेंद्र पाटील यांच्यापेक्षा त्यांचा प्रभाव मोठा नाही. हेच दिसून आले.तारळे विभागातूनही भाजपचे रामभाऊ लाहोटी आणि आमदार शंभूराज देसाई यांचा गट नरेंद्र पाटील यांच्यासाठी झटताना दिसत होता. उदयनराजे भोसले यांना पाटणमधून दरवेळेसारखे मताधिक्य मिळवून देण्यासाठी यावेळेस जबाबदारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरयांच्याकडे होती. सत्यजित पाटणकर यांनी मतदानादिवशी काही मतदान केंद्रावर भेटी दिल्या.खासदार उदयनराजे भोसले यांना पाटणमधील चाफळ, म्हावशी, मणदुरे, चाफोली, आणि कोयना विभागातील पूर्वेकडील गावामधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणून मताधिक्य मिळेल. कारणया परिसरात सत्यजित पाटणकर यांचे प्राबल्य आहे. त्यातच विक्रमबाबा पाटणकर यांनीसुद्धा शेवटच्या क्षणी का होईना उदयनराजे भोसले यांना मतदान करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.