शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांनो 'या' ठिकाणी जाताय? काळजी घ्या!, जाणून घ्या धोकादायक ठिकाणं

By दीपक शिंदे | Updated: June 28, 2023 14:21 IST

पावसामुळे डोंगरावरील वाटा, रस्ते होताहेत घसरडे

सातारा : आरोग्याच्या बाबतीत सातारकर सजग झाले असून, आबालवृद्धांची बाराही महिने निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती सुरू असते. कोणी अजिंक्यतारा सर करतो तर कोणी चार भिंतीचे पठार. कोणी यवतेश्वर घाटमार्गे कास पठाराकडे जातो तर काहीजण मोकळ्या मैदानात धावणे व चालण्याचा व्यायाम करतात. आता पावसाळा सुरू झाल्याने डोंगर-दऱ्यातील वाटा, रस्ते घसरडे होऊ लागले असून, नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

पावसाळ्यातील काही धोकादायक ठिकाणंयवतेश्वर डोंगर : यवतेश्वर डोंगरातून सांबरवाडीकडे पायी चालत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा डोंगर तीव्र उताराचा आहे. चुकून जर एखाद्या व्यक्तीचा चालताना तोल गेलाच तर पायवाटेवरील खडीवरून घसरुन कपाळमोक्ष झालाच समजा. पावसाळ्यात या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. मंगळाई देवी परिसर : अजिंक्यतारा किल्ल्यावरील खालच्या मंगळाई देवी मंदिराच्या मागील बाजूस घनदाट जंगल आहे. या जंगलात हौशी नागरिक चालण्यासाठी नेहमीच येत असतात. पावसाळ्यामुळे येथील पायवाटांवर चिखल साचतो. शिवाय पाला ओला झाल्याने त्यावरुन घसरण्याचा धोकाही संभवतो.महादरेतील पायऱ्या : महादरे गावातून यवतेश्वरकडे जाण्यासाठी ऐतिहासिक दगडी पायऱ्या आहेत. एक ट्रेकिंग पॉइंट म्हणून या पायऱ्यांकडे पाहिले जाते. हा परिसर देखील जंगलाने व्यापलेला असून, पायऱ्यांचे दगड पावसात गुळगुळीत होतात. त्यामुळे येथे भटकंतीसाठी जाणे जोखमीचे ठरते.महामार्गावरील सेवा रस्ते- काही हौशी सातारकर भल्या पहाटे पुणे-बंगळुरु महामार्गावरील सेवा रस्त्यावर चालण्याचा, धावण्याचा सराव करतात. या मार्गावर वाहने भरधाव वेगात निघून जातात. भरधाव वाहनांनी आजवर कितीतरी पादचाऱ्यांना धडक दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणे बंद करावे.

ही दक्षता घ्याच...

  • पावसाळ्यात चालणे अथवा पळण्याचा व्यायाम करत असाल तर पावसाळी चपला व शूज, रेनकोटचा वापर करा
  • चालण्यासाठी शक्यतो मोकळी मैदाने अथवा जिथे वाहनांची रहदारी कमी आहे अशीच ठिकाणे निवडा
  • डोंगरावर, जंगलात जाण्याचे धाडस शक्यतो करू नये
  • ज्यांना पावसात घराबाहेर जायचे नाही अशा व्यक्ती घरात देखील कार्डीओ व्यायाम करु शकतात 
टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा