शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाटणला गावागावांत डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:24 IST

मल्हारपेठ : कºहाडसह पाटण तालुक्याच्या डोंगररांगांमध्ये डरकाळी फोडणारा बिबट्या सध्या मात्र नागरी वस्तीत शिरकाव करू लागलाय. तालुक्यांतील अनेक गावांमध्ये ...

मल्हारपेठ : कºहाडसह पाटण तालुक्याच्या डोंगररांगांमध्ये डरकाळी फोडणारा बिबट्या सध्या मात्र नागरी वस्तीत शिरकाव करू लागलाय. तालुक्यांतील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असून, त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा नागरी वस्तीतील हा वाढता वावर भविष्यात चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी शक्यता प्राणीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.गत काही वर्षांपूर्वी कºहाड तालुक्यातील पाठरवाडीचा वाघधुंडी परिसर बिबट्यासह अन्य श्वापदांचे आश्रयस्थान मानले जात होते. वाघधुंडी परिसरात हमखास बिबट्या दिसायचा. त्यामुळे त्या परिसरात कोणीही फिरकत नव्हते. कालांतराने बिबट्या पाठरवाडीसह गमेवाडी, आरेवाडी, डेळेवाडी गावांच्या शिवारात दिसू लागला. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले. मात्र, काही वर्षांतच बिबट्याचा वावर एवढा वाढला की, कºहाड तालुक्यातील बहुतांश गावे भीतीच्या छायेखाली गेली. सध्या कºहाड तालुक्यातील वाठार, काले, नांदगाव, ओंड, उंडाळे, येवती, आरेवाडी, तांबवे, डेळेवाडी, उत्तर तांबवे, तळबीड या परिसरात बिबट्या पाहिल्याचे सांगितले जाते. या गावांसह आसपासच्या अन्य गावांतील ग्रामस्थही दहशतीखाली राहत आहेत.पाटण तालुक्यातील परिस्थितीही याहून वेगळी नाही. तालुक्यातील बहुतांश गावे डोंगर कपारीत वसली आहेत. या गावांच्या आसपास अनेकवेळा बिबट्या दिसतो. यापूर्वी त्याचा वावर नजीकच्या शिवारात असायचा. मात्र, सध्या तो गावामध्ये घुसून शेडमध्ये बांधलेल्या जनावरांवरही हल्ला करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाळीव जनावरेही सुरक्षित नसल्याची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी दोन बिबट्यांनी उरूल घाटात रस्त्याकडेला तासभर ठिय्या मांडला होता. बघ्यांची गर्दी झाली असतानाही ते तेथून हलले नाहीत. त्यानंतर कोळेकरवाडीकडेही त्याने आपला मोर्चा वळवला. सध्या कºहाड आणि पाटण तालुक्यांतील बहुतांश गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून, पाळीव जनावरांवरील हल्ल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते.बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे आवश्यक ती सामुग्री नाही. त्यामुळे अनेकवेळा बिबट्या समोर असुनही वन विभाग काहीच करू शकत नाही.बिबट्या किती..? वनविभाग अनभिज्ञकºहाडसह पाटण तालुक्यामध्ये ज्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढत आहे, त्या प्रमाणात त्यांची देखरेख केली जात नसल्याचे नसते. एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसलाच तर त्यापुढील त्याच्या हालचालीची कोणतीही माहिती वनविभागाला नसते. संबंधित बिबट्याचा अधिवास, वावरक्षेत्र याबाबत वनविभाग पूर्णपणे अनभिज्ञ असतो. त्यामुळे परिसरात बिबट्यांची संख्या किती आहे, याबाबतही ठोस माहिती वनविभागाला उपलब्ध होत नाही.बिबट्याप्रवण क्षेत्रात होतेय वाढज्या-ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होते, अशा ठिकाणांची वनविभागाकडून नोंद ठेवली जाते. कºहाड तालुक्यात गतवर्षी पूर्वीच्या नोंदींसह आणखी ३९ ठिकाणी बिबट्यांचे दर्शन झाल्याचे वनविभागाची आकडेवारी सांगते. यावरून विभागात बिबट्यांची संख्या वाढल्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही वाढती संख्या व मानवी वस्तीत होणारा शिरकाव लक्षात घेता वन व वन्यजीव विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणे गरजेचे आहे.