शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीच्या पाण्यासाठी म्हसवडमध्ये मोर्चा-शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:41 IST

माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवडसह आजूबाजूच्या अनेक गावांसाठी उरमोडी धरणाचे पाणी माण नदीत सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हसवड कडकडीत बंद पाळला. यावेळी शेकडो

ठळक मुद्दे कडकडीत बंद

म्हसवड : माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवडसह आजूबाजूच्या अनेक गावांसाठी उरमोडी धरणाचे पाणी माण नदीत सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हसवड कडकडीत बंद पाळला. यावेळी शेकडो शेतकºयांनी मोर्चा काढून बसस्थानक चौकात काहीकाळ रास्ता रोको केला.

राज्य सरकारने माण तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा काहीअंशी प्रश्न सुटण्यासाठी उरमोडीचे पाणी सोडले. तालुक्यातील काही भागांत हे पाणी आले; पण पूर्व भागात आलेले नाही. त्यामुळे येथील शेतकरी अनेक दिवसांपासून उरमोडीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत होते.

पाण्यासाठी अनेकवेळा अधिकाºयाकडे हेलपाटे मारूनही काही उपयोग झाला नाही. म्हसवडपासून सहा किलोमीटरपर्यंत पाणी येते; पण आपल्याला मिळत नाही, हे ओळखून या परिसरातील शेतकºयांनी एकत्रित येत माजी नगराध्यक्ष विलास माने, माजी नगरसेवक कैलास भोरे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धनाथ मंदिरापासून मोर्चा काढला. बसस्थानक चौकात सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

‘म्हसवड परिसरात उरमोडीचे पाणी सोडण्यास काही राजकीय मंडळींचा विरोध असल्याने त्यांनी अधिकाºयांना सोबत घेऊन या भागाला उरमोडीचे पाणी जाणीवपूर्वक मिळू द्यायचे नाही, असा घाट घातला आहे,’ असा आरोप अनेक आंदोलनकर्त्यांनी केला. पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांच्या कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध केला.यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या शेतकºयांच्या प्रश्नासाठी म्हसवड शहरातील व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवून शेतकरी बांधवांच्या लढ्याला पाठिंबा दिला. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसवड पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सातारा-पंढरपूर मार्गावर रास्ता रोकोउरमोडीच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी सकाळपासूनच म्हसवडमध्ये दाखल होत होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचं’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही,’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सातारा-पंढरपूर मार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंप