शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यात ‘परशुराम भवन’ उभारणार : आशिष दामले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:10 IST

ब्राह्मण समाजाचा डेटा मिळवणार

कऱ्हाड (जि. सातारा) : ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकासाठीच परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १० लाखांपर्यंत, तर परदेशी शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्ज प्रस्तावित केले आहे, तर व्यवसायासाठी व्यक्तिगत १५ लाखांपर्यंत, तसेच ५० लाखांपर्यंतचे गट कर्ज आणि महिला बचत गटासाठी २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु, या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘परशुराम भवन’ उभारण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, अशी माहिती परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.कऱ्हाड येथे रविवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पश्चिम विभागाचा मेळावा पार पडला. त्या अधिवेशनासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले उपस्थित होते. दामले म्हणाले, ‘महामंडळाच्या स्थापनेपासूनच ब्राह्मण समाजातील शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय या गोष्टी वाढल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त ब्राह्मण समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता त्यांनी उद्योजक बनावे. इतर ५०/१०० लोकांना त्यांनी नोकऱ्या द्याव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’

खरंतर आम्ही या महामंडळासाठी शासनाकडे ३०० कोटींची मागणी केली आहे. शासनाने सध्या १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महामंडळाला लागेल तसा निधी देण्याचा शब्द दिला आहे. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्राह्मण समाजाचा डेटा मिळवणारमहाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाचा डेटा मिळवण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटला आम्ही महामंडळाच्या वतीने पत्र दिले आहे. त्यातून राज्यांमध्ये पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांची माहिती आम्हाला मिळेल. मग खऱ्या अर्थाने काम करणे सोपे होईल. पौरोहित्य करणाऱ्या लोकांसाठी एक वर्षाचा शासनाचा अभ्यासक्रम सुरू करून त्यांना त्याची पदवी देता येईल का? याचाही विचार प्राधान्याने सुरू आहे, असेही एका प्रश्नावर बोलताना दामले यांनी सांगितले.