शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

चाळीस ठिकाणी पार्किंग व्यवस्था !

By admin | Updated: September 23, 2016 23:59 IST

सातारा मराठा महामोर्चा : नियोजन बैठकीत झाला एकमुखी निर्धार; मुस्लीम समाजाच्या वतीने मोर्चादिनी ४० हजार पाण्याच्या बाटल्यांची सोय

सातारा : साताऱ्यात सोमवार, दि. ३ आॅक्टोबर रोजी सातारा मराठा महामोर्चा काढण्यात येणार आहे. कसलेही संकट ओढावले तरी महामोर्चा यशस्वी करायचाच, अगदी पाऊस कोसळू लागला तरी भर पावसात महामोर्चा काढायचा, मागे हटायचे नाही, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. दरम्यान महामोर्चादिनी साताऱ्यात चाळीस ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. नियोजन बैठकीला मोठ्या संख्येने लोकांची हजेरी होती. बैठकीमध्ये ३ आॅक्टोबरच्या महामोर्चाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, मोर्चाचे मार्ग आदी गोष्टींबाबत संयोजकांतर्फे सूचना देण्यात आल्या. मोर्चा सातारा शहरात होणार असल्याने सातारा तालुक्यावर महामोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी असणार आहे. महामोर्चाचे नियोजन व तालुक्यातून जास्तीत जास्त बांधव या महामोर्चात सामील होतील, यासाठीही नियोजन करावे लागणार असल्याने बैठकीत अनेकांनी सांगितले. ‘मराठ्यांनी सर्वच समाजांसाठी मोठे योगदान दिले आहे. पुढच्या पिढ्यांसाठी आरक्षणाची मागणी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासह या महामोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी झालेल्या सातारा मराठा महामोर्चाच्या नियोजन बैठकीत केले. ‘सातारा मराठा महामोर्चासाठी सर्वांनी आपल्या ताकदीने योगदान द्यावे. महामोर्चामध्ये शहरात अस्वच्छता होणार नाही, याचीही खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे. नोकरीसाठी आपल्याला आरक्षणाचा लाभ झाला नाही. आता पुढच्या पिढीला तरी तो होईल, याची काळजी घ्यावी लागणार आहे,’ असेही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. सातारा मराठा महामोर्चाला मुस्लीम समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष नासीर शेख, फिरोज पठाण, इरफान बागवान, सादिक शेख, इरशाद बागवान, हाजी इक्बालभाई बागवान, हाजी जलालुद्दीन शेख, माजी नगरसेवक इम्तेखाब बागवान, हाफीज हैदर आदींनी बैठकीस्थळी येऊन सातारा मराठा महामोर्चाला पाठिंबा दिला. ३ आॅक्टोबर रोजी मोर्चेकऱ्यांठी शाही मशिदीसमोर ४० हजार पाण्याच्या बाटल्यांची सोय मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. सफाई कामगार संघटनेतर्फेही महामोर्चाला पाठिंबा दर्शविण्यात आला. (प्रतिनिधी) कोणालाही वेगळी वागणूक नाही..! ४सातारा येथील मराठा महामोर्चा विना निधी संकलनाशिवाय होणार आहे. त्याचेही यावेळी टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. महामोर्चात साताऱ्याचे लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. जे लोकप्रतिनिधी सहभागी होणार त्यांना कोणतीही वेगळी ट्रीटमेंट मिळणार नाही. तेही मराठा बांधवांबरोबरच सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर महामोर्चाच्या अग्रभागी विद्यार्थिनी, त्यानंतर महिला, युवती, ज्येष्ठ नागरिक, युवक अशी रचना राहणार आहे. सातारा येथे सर्वच तालुक्यांतून माणसे येणार आहेत. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्याचबरोबर त्यांना कोणतीही अडचण भासणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचा निर्णय सातारा शहरातील कार्यकर्त्यांनी यावेळी जाहीर केला. दरम्यान, सातारा शहरातील महिलांनी शाहू स्टेडियमवर तर पुरुषांनी पोलिस परेड ग्राऊंड येथे जमायचे आहे. पार्किंगची माहिती रविवारी प्रसिद्ध होणार ४सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या नियोजन बैठक झाल्या आहेत. मात्र, सातारा तालुक्यातील बैठक सर्वात शेवटी घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक झाली. बैठकीत अनेकांनी आपली मते मांडली. ४पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीतील माहिती देण्यात आली. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात ३५ ते ४० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याची संपूर्ण माहिती दि. २५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. ही आहे आचारसंहिता... ४महामोर्चा कोणत्याही जाती-धर्माविरोधात नाही, याचा प्रसार ४महामोर्चामध्ये कोणतीही निदर्शने करायची नाहीत किंवा घोषणाही द्यायची नाही ४महामोर्चात सहभागी होताना हातात पक्षाचा बॅनर अथवा झेंडा घ्यायचा नाही ४महामोर्चाला गालबोट लागू द्यायचे नाही ४अनोळखी वस्तूला हात लावायचा नाही ४महामोर्चात सामील व्हायचे म्हणून वेगात गाडी चालवायची नाही ४घरातून लवकर निघायचे ४प्रत्येकानं स्वत:जवळ ओळखपत्र बाळगावे ४महामोर्चात सामील होताना मोबाईल बंद ठेवायचा ४वाहन ओव्हरटेक करायचे नाही ४पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन ४‘मी मराठा लाख मराठा’ लिहिलेली टोपी डोक्यात घालायची ४महामोर्चात कोणीही मान्यवर नाही, अथवा लोकप्रतिनिधी म्हणून कोणी सामील होणार नाही ४महामोर्चाला मदत म्हणून कोणाला पैसे देऊ नका