शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
5
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
6
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
7
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
8
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
9
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
10
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
11
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
12
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
13
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
14
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
15
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
16
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
17
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
18
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
20
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:04 IST

पत्नीचा जाचहट करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गणेश दिनकर मानकुमरे (वय ३०, रा.भुतेघर ता.जावली) याला जिल्हा न्यायाधीश १ ए.जे. खान यांनी ३ वर्षाची साधी कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला शिक्षादुचाकी घेण्यासाठी जाचहाट, रॉकेल ओतून पेटवून घेतले

सातारा : पत्नीचा जाचहाट करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गणेश दिनकर मानकुमरे (वय ३०, रा.भुतेघर ता.जावली) याला जिल्हा न्यायाधीश १ ए.जे. खान यांनी ३ वर्षाची साधी कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अर्चना गणेश मानकुमरे (वय २०, रा. भुतेघर ता.जावली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई कोंडाबाई रामचंद्र मोरे (वय ५८, रा.ऐरणे ता. महाबळेश्वर) यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, अर्चना यांचा गणेश मानकुमरे याच्याशी २००९ साली विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर दुचाकी घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी तिचा जाचहाट सुरू झाला. यातूनच २ जून २०१२ रोजी मध्यरात्री अर्चनाने घरामध्ये रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत त्या १०० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक राजेश नाईक यांनी या घटनेचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी गणेश मानकुमरे याला तीन वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उर्मिला फडतरे व अ‍ॅड. ज्योती दिवाकर यांनी काम पाहिले. प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस हवालदार भास्कर निकम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर