शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंकज म्हणतोय माझ्यात अजमल कसाब घुसलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 13:15 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभार याच्या कबुली जबाबाने पोलिसांची डोकी अक्षरश: चक्रावली आहेत. माझ्यात अजमल कसाब घुसला आहे. त्या भूमिकेत मी गेलोय. त्यामुळे माझ्याकडून ही पोस्ट टाकली गेलीय, अशी हास्यास्पद माहिती तो पोलिसांना देत आहे.

ठळक मुद्देपंकज म्हणतोय माझ्यात अजमल कसाब घुसलायमुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढविण्याचा सल्ला

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभार याच्या कबुली जबाबाने पोलिसांची डोकी अक्षरश: चक्रावली आहेत. माझ्यात अजमल कसाब घुसला आहे. त्या भूमिकेत मी गेलोय. त्यामुळे माझ्याकडून ही पोस्ट टाकली गेलीय, अशी हास्यास्पद माहिती तो पोलिसांना देत आहे.मुंबई येथील नालासोपारा येथून पंकजला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. तू ही पोस्ट सोशल मीडियावर का टाकली? अशी विचारणा पोलिसांनी त्याच्याकडे केली. त्यावेळी त्याने काही गंभीर तर काही मजेशीर किस्से पोलिसांना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे जाहीर सभा होती. या सभेवेळी मी मोबाईलचे कव्हर विकण्यासाठी तेथे गेलो होतो. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदून अनेकजण जात होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका संभावू शकतो, असे मला वाटले. माझ्यात अजमल कसाब घुसला. त्या भूमिकेत मी गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जीवाचे बरे-वाईटची धमकी मी दिली.मुख्यमंत्र्यांना पोलिसांची सुरक्षा कमी आहे, हे तू चांगल्या मार्गाने सांगू शकला असतास, असे पोलिसांनी त्याला विचारले. पंकज म्हणाला, मी अतिरेकी असल्यासारखे काहीक्षण मला वाटले. त्यामुळेच हा प्रकार माझ्या हातून घडला. अशा प्रकारची संदर्भहीन उत्तरे तो देत असल्यामुळे पोलीसही हतबल होत आहेत. सध्या पंकजवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर