शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

पांगारे, पळसावडे धरणांना धोक्याची घंटा !

By admin | Updated: September 14, 2014 23:54 IST

सांडव्यांची दुरवस्था : धोका कायम; ठिकठिकाणी पाझर

परळी : सातारा तालुक्यातील ठोसेघर पठारावर असणारी पांगारे व पळसावडे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. असे असले तरी सांडव्यांच्या दुरवस्थेमुळे या धरणांना कायमचा धोका निर्माण झालेला आहे. सांडव्याला भगदाड पडले असून, भराव खचून धरणाच्या भिंतीवर काही ठिकाणाहून पाझर फुटले आहेत. वेस्ट वेअर विमोचन विहिरीतूनही पाण्याचे पाट वाहत आहेत. पांगारे व पळसावडे या धरणांच्या सांडव्याबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यावर प्रकल्पाच्या कामात काही त्रुटी असल्याचे सांगत त्यांनी उपाययोजना करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. मात्र, हे नियोजन कागदावर राहिले आहे. तसेच पळसावडे धरण प्रकल्पास गळती असल्याचे पाटबंधारे विभागाने लेखी पत्र पळसावडे ग्रामपंचायतीस दिले आहे. मात्र, त्यावरही काहीच उपाययोजना झालेली नाही. पांगारे प्रकल्पाची घळभरणी २००० साली पूर्ण झाली. घळभरणीदरम्यान तांत्रिक बाबी पूर्ण न केल्यानेच या प्रकल्पास गळती लागत आहे. प्रकल्पाच्या मुख्य पायात पायाभरणी व इतर काही बाबी आवश्यक असतात. तसेच भूस्तरावरील वैज्ञानिक चाचणी व्यवस्थित न झाल्याने या प्रकल्पाला धोका पोहोचू शकतो, असे सांगण्यात येत आहे. २००६-०७ यावर्षीच्या कालावधीत झालेले दगडी पिचिंगचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत. दगडी पिचिंगचे काम वाहून गेलेले आहे. प्रकल्प व सांडव्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून टाकलेला मातीचा भराव पूर्णपणे खचलेला आहे. पांगारे प्रकल्पात २.७२ दशलक्ष घ. मी. पाणीसाठी आहे. या परिसरात २५०० ते २७०० मिमी पावसाची नोंद होते. प्रकल्पाचे निकृष्ट दर्जाचे काम होऊनही ठेकेदारांची बिले संबंधित विभागाने काढलीच कशी ? याबाबत संबंधित अधिकारी, ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. सद्य:स्थितीत धरणाचा वॉल, कॅनॉल, सांडव्याच्या धराच्या भिंतीबाजूचा भाग यामधून पाणी वाहत आहे. धरणाच्या भिंतीवरील पिचिंगचा दगड-मातीचा भराव खचला आहे. भिंतीवर मोठी झुडपे उगवली आहेत. १९९६ साली या प्रकल्पाचे काम सुरू होऊन २००१ मध्ये पाणीसाठा झाला. सज्जनगड, वाघवाडी, कारी या गावांना यामधून पाणीपुरवठा होतो. मात्र, पांगारे गावाची एक गुंठा जमीनही ओलिताखाली येत नाही. प्रकल्पासाठी जमीन संपादित करून १७ वर्षांनंतरही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पळसावडे धरणाच्याही अशा अवस्थेमुळे सांडव्याला भगदाड पडलेले आहे. त्यामुळे अनेक हेक्टर क्षेत्र वाहून गेलेले आहे. २००४ पासून विमोचन विहिरीचा व्हॉल्व्हच उघडला असून, तो आजही तसाच आहे. या धरण प्रकल्पाची १८२४.४५ दशलक्ष घ.मी. इतकी पाणीसाठ्याची क्षमता आहे. या प्रकल्पाच्या विमोचन विहिरीत अहोरात्र १२ महिने पाणसाठा असल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाणी न सोडताच धरणाचा तळ दिसतो. या प्रकल्पाच्या भिंतीवर सोलिंग पिचिंगचे काम निम्मे केले आहे. सांडव्याचे काम अर्धवट आहे. (वार्ताहर) निधी पोसण्यासाठीच का ?पांगारे प्रकल्पाच्या कालव्याला गळती असून, पाणी न सोडताच उन्हाळ्यात हा प्रकल्प निम्मा रिकामा होतो. या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे पैसे नसताना बंदिस्त पाईपसाठी सव्वातीन कोटींचा निधी उपलब्ध केल्याचे सांगण्यात येते. धरणात पाणी नाही मग बंदिस्त पाईपलाइन कशासाठी? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. हा निधी शेतीला पाणी मिळण्यासाठी की ठेकेदार, अधिकाऱ्यांना पोसण्यासाठी? असा संतापजनक सवालही नागरिकांनी केला आहे.