शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेड सेपरेटरचा फलक आपसूकच खाली पडला; उदयनराजे भोसले समर्थकांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 08:49 IST

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अचानक उद्घाटन  केलेल्या ग्रेडसेपरेटरचा फलक शुक्रवारी रात्री अज्ञाताने फाडल्याचा समज करत कार्यकर्त्यांनी सकाळी निषेध केला. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा फलक अपसूकच खाली पडला असल्याचे निदर्शनास आले.

पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी उदयनराजे भोसले यांनी अचाकन केले. त्यानंतर हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी रात्री वायसी कॉलेजसमोरील भुयारी मार्गाचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक अज्ञाताने फाडून खाली फेकून दिला. अशी चर्चा शहरात सुरू झाली. त्यानंतर  उदयनराजे भोसले समर्थकांनी शनिवारी सकाळी पोवई नाक्यावर धाव घेतली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जलद कृतीदलाच्या दोन तुकड्यांसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा पोवई नाक्यावर पोहोचला.  

या घटनेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणा देत संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. उदयनराजे भोसले यांनी घटनास्थळी न येता कार्यकर्त्यांना फोनवर शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यापर्यंत मूक मोर्चा काढला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार इतर कोणी केला नसून, आपसूकच फलक खाली पडला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस