पाचगणी येथे तब्बल चारशे फूट दरीत कार कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:32 AM2020-01-13T00:32:43+5:302020-01-13T00:32:53+5:30

पाचगणी : येथील हरिसॅन फॉली थापा येथून मुंबईतील पर्यटक दाम्पत्याची कार सुमारे चारशे फूट दरीत कोसळल्याची घटना रविवारी रात्री ...

At Panchgani, the car crashed into the valley about four hundred feet | पाचगणी येथे तब्बल चारशे फूट दरीत कार कोसळली

पाचगणी येथे रविवारी रात्री मुंबईतील पर्यटकांची कार तब्बल चारशे फूट दरीत कोसळली. जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी युवकांचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.

Next

पाचगणी : येथील हरिसॅन फॉली थापा येथून मुंबईतील पर्यटक दाम्पत्याची कार सुमारे चारशे फूट दरीत कोसळल्याची घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जखमी पतीला बाहेर काढण्यात यश आले असून, पत्नीचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाचगणीतील हरिसॅन फॉली थापा या ठिकाणी फिरावयास मुंबईतील एक दाम्पत्य आले होते. चालकाचा अचानक कारवरील ताबा सुटल्याने कार थाप्यावरील खोल दरीत चारशे फूट कोसळली. या अपघाताची माहिती समजताच महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक कोंडुबैरी व कर्मचारी तसेच पाचगणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स, वाई पोलीस असा सारा फौजफाटा घटनास्थळी तत्काळ दाखल झाला. या सर्वांनी मिळून दरीत मदतकार्यास सुरुवात केली. खोल दरीत उतरून उमेद बिलाल खटाव (वय ३५) यांना बाहेर काढण्यात यश आले. खटाव यांना पाचगणीतील बेल एअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी सना उमेद खटाव (वय ३२) यांना दरीतून शोधण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अत्यंत अवघड अशी दरी असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: At Panchgani, the car crashed into the valley about four hundred feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.