शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पंचायत समितीत ‘गोष्ट छोटी कडबाकुट्टीएवढी’!

By admin | Updated: April 7, 2016 23:49 IST

कारण-राजकारण : पंचायत समितीत महिला सदस्यांच्या पतींच्या उचापती वाढल्या

प्रमोद सुकरे-- कऱ्हाड  -येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेक विषयांवर चर्चा झाली; पण त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पार्टी मीटिंगमध्ये कडबाकुट्टीवरून झालेल्या गुऱ्हाळाची चर्चा राजकीय वर्तुळात जोराज सुरू आहे. त्यामुळे पंचायत समिती महिला सदस्यांच्या पतींच्या उचापती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘देव’ राज्यात हे चालतं तरी कसं, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत. घडलं असं की, एप्रिलफुल दिनी म्हणजेच १ एप्रिलला पंचायत समितीची सभा नेहमीप्रमाणेच झाली. दुष्काळसदृश परिस्थिती, पाण्याची टंचाई, कृषीची परिस्थिती, आरोग्य आदी विभागांचा आढावा झाला. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. असाच एका विषयाचा आढावा घेताना संबंधित विभागाचे अधिकारी गैरहजर होते. ते आजारी असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. त्यांच्या आजारपणाबद्दल विरोधी सदस्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने सकाळी पार्टी मीटिंगला हजेरी लावल्याचे समोर आले. तेथे अधिकारी, पदाधिकारी आणि इतरांच्यात चांगलेच तू-तू मैं-मंै झाल्याची चर्चा सुरू आहे. पार्टी मीटिंगमध्ये प्रत्यक्ष सदस्य नसणाऱ्या एकाने काही अधिकारी ऐकत नसल्याचे, मनमानी करीत असल्याची तक्रार करीत वादाचे जणू रणशिंग फुंकले. मग ‘देव’ माणसाच्या समोर ‘त्या’ अधिकाऱ्याला बोलविण्यात आलं. बराच वेळ ‘धीर’ धरलेल्या एका पाटलांनीही तोंडसुख घेतले. तर नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या एका सदस्याने ‘लक्ष्मण’रेषा ओलांडली म्हणे!, ‘बिचारे डॉक्टर मात्र शांतपणे सारं ऐकून घेत होते. खरंतर ‘गोष्ट छोटी कडबाकुट्टीएवढी.’ कडबाकुट्टी वाटपाच्या कार्यक्रमाला आम्हाला का बोलवलं नाही, कोणताही कार्यक्रम असला तर आम्हाला बोलवलं पाहिजे, लाभार्थींची नावे आम्हाला विचारल्याशिवाय ठरवायची नाहीत, अशा अनेक गोष्टींवर ‘काबाडकष्ट’ करून निवडून आलेल्यांनी अन् आपल्या धर्मपत्नींना निवडून आणलेल्यांनी बराच वाद घातला; पण सरतेशेवटी संबंधित डॉक्टरनी माझे काम चांगले नसेल तर तशी प्रशासकीय कारवाई करा. माझा बदलीचा प्रस्ताव पाठवा, असे सांगून ते निघून गेले. पार्टी मीटिंगमध्ये अवमान केल्याची भावना या वर्ग १ च्या अधिकाऱ्याच्या मनात निर्माण झाल्याने ते मासिक सभेला आले नाहीत, असे विरोधी बाकावरील सदस्यांचे मत आहे.कऱ्हाड पंचायत समितीने ‘यशवंत पंचायत राज’ अभियानात पुणे विभागात प्रथम तर राज्यात दुसरा क्रमांक नुकताच मिळविला आहे. याचा अर्थ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा समन्वय चांगला आहे. त्यामुळे हे यश मिळू शकले.मीटिंगला बोलविण्याचे कारण तरी काय?खरंतर अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करीत असेल तर त्याची चर्चा मासिक सभेत होऊ शकते. यापूर्वी अशा अनेक अधिकाऱ्यांना सभागृहात निरूत्तर करण्यात आले आहे. मात्र, संबंधित वर्ग १ च्या अधिकाऱ्याला पार्टी मीटिंगमध्येच बोलवून का खडसावण्यात आले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. अधिकाऱ्याला पार्टी मीटिंगला बोलवण्याचं कारण तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.गुऱ्हाळातून फलश्रुती होते का ?पार्टी मीटिंगला अधिकाऱ्यांना बोलावून सदस्य नसणाऱ्यांनी त्यांना काहीही बोलणे परंपरेला साजेसे आहे का? त्यामुळे अधिकाऱ्यांचे मनौधैर्य खचणार तरी नाही ना? अशा चर्चेच्या गुऱ्हाळातून फलश्रुती होते का? याचा विचार कोण करणार?