शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांना न जमले ते प्रशासनाने केले, पाचगणीकर जनतेत समाधानाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:54 IST

प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाचगणीकर नागरिकांत विकासात्मक अधिकारी म्हणून प्रतिमा उजळ झाली

पाचगणी : ‘कोरोना काळात शहरांतर्गत रस्त्यांची दुर्दशा झालेली असताना त्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देणे अपेक्षित असताना सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासकीय कारभार सुरू झाला. याच प्रशासकीय कारभारात नागरिकांच्या जिव्हाळ्याचा शहरांतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून सत्ताधाऱ्यांना सत्तेत जमलं नाही ते प्रशासनाने करून दाखवले आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाचगणीकर नागरिकांत विकासात्मक अधिकारी म्हणून प्रतिमा उजळ झाली आहे. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचे कौतुक होत आहे. पाचगणी नगरपरिषदेत आगामी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम लागला आहे. कार्यकाळ संपताच सत्ताधाऱ्यांची सत्ता बरखास्त झाली आहे. प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे. 

कोरोना काळात शहर विकासाच्या अनेक कामांना खीळ बसली आहे. याकरिता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या पायात पाय घातल्याने सत्ताधाऱ्यांना काम करता आले नाही असे म्हटलं गेले आहे. त्यामुळे जनतेला अपेक्षित कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामध्ये शहरअंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे शहरात प्रवास करताना नागरिकांचा जीव मेटाकुटीस येत होता.सत्ताधारी सत्तेवरून पायउतार होताच पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू झाला. लोकांच्या जिव्हाळ्याचा रस्त्याचा प्रश्न मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी जागेवर उभे राहून मार्गी लावल्याने अनेक दिवस खितपत पडलेले शहर हद्दीतील खिंगर रोड गावठाणमधील रस्ते खड्डेमुक्त झाल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे.हायवेचा फील हा रस्ता चांगला झाल्याने यावर मध्यभागी डिव्हायडर पांढरे पट्टे मारले आहेत. झेब्राक्रॉसिंगमुळे हायवेचा फील येत आहे. सुसाट वेगाने जाणाऱ्यांना आता जागोजागी केलेल्या गतिरोधकांमुळे ब्रेक लागत आहे.उमेदवारांचा विकासाचा मुद्दा हिरावला ही कामे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सेवेत झाल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचा विकासाचा मुद्दा हिरावला गेला आहे.जनता लक्षात ठेवतेकोरोना काळात लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षित असणारी मदत लोकांना पोहोचली का? लोक असे मुद्दे निवडणुकीच्या अनुषंगाने लक्षात ठेवतात. पडत्या काळात विचारपूस कोणी केली, हे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर