शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गावाबाहेरून गावकारभारी पाहतायत कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:17 IST

रवींद्र माने । ढेबेवाडी : खुर्ची आणि सत्तेच्या मोहापायी लाखो रुपयांचा चुराडा करून ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी विराजमान झालेल्या गावकारभाऱ्यांनीच गावाकडे ...

रवींद्र माने ।ढेबेवाडी : खुर्ची आणि सत्तेच्या मोहापायी लाखो रुपयांचा चुराडा करून ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी विराजमान झालेल्या गावकारभाऱ्यांनीच गावाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसत आहे. तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सरपंच आणि पदाधिकारीही गावापासून कोसोदूर वास्तव्यास असल्याने गावकारभारासह ग्रामस्थांच्या वैयक्तिक अडचणींची सोडवणूक करणार कोण? असा प्रश्न अनेक गावांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.गावापासून बाहेर राहून कारभाराची सूत्रे हाताळणाºया अशा सरपंचांकडून मासिक सभा, ग्रामसभांनाही वर्षानुवर्षे दांडी मारली जात आहे. अशा दांडीबहाद्दर गावकारभाऱ्यांमुळेच गावांच्या विकासाला खीळ बसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.दुर्गम, डोंगराळ आणि नैसर्गिक आपत्तींचा तालुका म्हणून पाटणची ओळख आहे. तालुक्याची भौगोलिक रचना अत्यंत अडचणींची असल्याने अजूनही अनेक गावे वाड्या-वस्त्या दळणवळणासह अन्य मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने अपेक्षित रोजगार येथे निर्माण होण्यास मोठी अडचण झाली आहे. परिणामी २४१ ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र असलेल्या पाटण तालुक्यातील बहुतेक सरपंच आपल्या कुटुंबीयांसह शहरात वास्तव्यास आहेत.तालुका जरी दुर्गम आणि डोंगराळ असला तरी राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत आणि संवेदनशील असल्याची या पाटण तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे राजकीय निवडणूक मग ती कोणतीही असो अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांची सूत्रे ही गावापेक्षा परगावी वास्तव्यास असणाºया मंडळींनी स्वत:कडेच ठेवली आहेत. राजधानीतून गावाचा गाडा हाकणाºया या मंडळींमुळेच आजही गावांमध्ये मागासलेपण जाणवत आहे. पदाधिकारी मंडळीच मासिक बैठका तसेच ग्रामसभांना उपस्थित राहत नसतील तर गावाच्या विकासाची आणि अडीअडचणींंची चर्चा कोण करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.खुर्चीसाठी केलाजातो हा सर्व अट्टाहासनिवडणुकीत होतो साम, दाम, दंडाचा वापर.लाखो रुपयांचा केला जातो चुराडा.एक वेळ सेवा करण्याची मागितली जाते संधी.मुंबईसह परगावी असलेल्या मतदारांवर केला जातो खर्च.सत्तेसाठी घेतला जातो वरिष्ठ नेत्यांचा आधार.निवडणूक काळात मिळते ढाबा संस्कृतीला बळसब कुछ ‘अण्णासाहेबांच्या’ हाती..!ग्रामपंचायतीच्या विकासात्मक बाबींसाठी जेवढी सरपंचांची भूमिका महत्त्वाची तेवढीच ग्रामसेवकही महत्त्वाचा घटक. दोघांच्या समन्वयाबरोबरच गावकºयांचे सहकार्य लाभले तरच गावाचा गाडा योग्य दिशेने मार्गस्थ होण्यास मदत होते. मात्र गावचे गावनेतेच गावाची सर्व सूत्रे अण्णासाहेब म्हणजे तलाठ्यांच्या हाती देऊन गावाबाहेरून कारभार करू लागल्याने गावागावात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.गावकारभाºयांविरोधात संतापज्या विश्वासाने गावातील मतदारांनी पदाधिकाºयांना निवडून दिलेले असते. त्याच विश्वासाने सरपंच आणि सदस्य, पदाधिकाºयांनी काम करणे गरजेचे असते. गावातील अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मात्र दुर्दैवाने ज्यांना निवडून दिले तेच गावकारभारी गावात राहत नसतील तर ते गावाचेच दुर्दैव म्हणावे लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया डोंगरपठारावर राहत असलेल्या ग्रामस्थांतून व्यक्त केल्या जात आहेत.