शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

Satara: ..अन्यथा पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करु, व्यसनमुक्त युवक संघाने दिला इशारा

By दीपक शिंदे | Updated: September 24, 2024 15:42 IST

सातारा : आळजापूर, ता. फलटण येथील परमिट रूम, बारचा परवाना तत्काळ रद्द करावा. अन्यथा उत्पादन शुल्क तथा सातारा जिल्ह्याचे ...

सातारा : आळजापूर, ता. फलटण येथील परमिट रूम, बारचा परवाना तत्काळ रद्द करावा. अन्यथा उत्पादन शुल्क तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या सातारा येथील निवासस्थानासमोर आंदोलन करु, असा इशारा व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.व्यसनमुक्त युवक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आळजापूर येथे ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा कोणताही ना हरकत दाखला न घेता ४ जुलैला ग्रामपंचायत क्षेत्रात परमिट रूम, बारचा परवाना सातारा उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला आहे. याविरोधात ग्रामस्थ आणि महिला संतप्त झाले आहेत. तसेच सरपंच शुभम नलवडे यांच्याकडेही बार तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सरपंच नलवडे यांनी ग्रामसभा बोलावून बारचा विषय समोर ठेवल्यावर उपस्थित सर्वच महिला, पुरुषांनी दारू दुकान बंद करावे या बाजूने हात उंचावून पाठिंबा दिला आहे. 

उत्पादन शुल्क विभाग परवाना देतेच कसा ? गावाच्या हद्दीत कोणताही व्यवसाय करताना ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मागितला जातो. मात्र, आळजापुरात दारू दुकानाला परवानगी देताना उत्पादन शुल्क विभाग ग्रामपंचायतीची परवानगी नसताना परवाना देतेच कसा ? असाही प्रश्न आहे. ग्रामस्थांना शांतता हवी आहे. यासाठी बारचा परवाना तत्काळ रद्द करावा. अन्यथा व्यसनमुक्त युवक संघ बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन करणार आहे, असा इशाराही विलासबाबा जवळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरguardian ministerपालक मंत्रीShambhuraj Desaiशंभूराज देसाई