शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोयनेतून विसर्ग सुरुच, धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर

By नितीन काळेल | Updated: August 1, 2024 19:04 IST

धोम धरणांतून विसर्ग वाढला..

सातारा : जिल्ह्यात पाऊस वाढत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर स्थिर आहेत.जिल्ह्याला मागील आठवड्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. सलग दहा दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यांतही चांगला पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिम भागात धुवाॅधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे विसर्ग सुरू करावा लागला. मात्र, पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. दोन दिवस उघडझाप सुरू राहिली. पण, बुधवारपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारीही सकाळपासून पाऊस सुरूच होता.

गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत ३ हजार ७६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे आतापर्यंत ४ हजार ४३६ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात पाथरपूंज नंतर नवजा येथेच सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला २४ तासांत ८४ तर दोन महिन्यांत ४ हजार ९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पाऊस वाढल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढत चालली आहे.सकाळच्या सुमारास सुमारे ४५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८५.८१ टीएमसी झाला होता. त्यातच मागील काही दिवसांपासून धरणातून विसर्ग सुरू आहे. पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जाते. त्याचबरोबर धरणाच्या सर्व सहा दरवाजातूनही ४० हजार क्यूसेक विसर्ग कायम आहे. सध्या धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर आहेत.

धोम धरणांतून विसर्ग वाढला..वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला आहे. त्यामुळे धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी आवक आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सकाळच्या सुमारास ३ हजार ३६४ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. दुपारपासून सांडव्यावरुन सुमारे ४ हजार ३०० क्यूसेकपर्यंत विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण