शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

नगराध्यक्षपदासाठी २0 प्रभागांना संधी!

By admin | Updated: July 8, 2016 01:06 IST

खुले आरक्षण : काट्याची टक्कर पाहायला मिळणार--सातारा पालिकेतून

सातारा : साताऱ्याचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. अडीच वर्षांच्या आरक्षणाच्या आधारावर निघालेली ही सोडत कायम ठेवल्यास सलग पाच वर्षे एकच व्यक्ती नगराध्यक्षपदावर राहणार आहे. शहरातील २0 प्रभागांतून कोणीही व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी उभा राहू शकतो, संपूर्ण शहरातून संबंधिताला मतदान होऊन कोण किती पाण्यात आहे, हे कळू शकेल. आगामी नगरपालिका निवडणुकीत २० प्रभागांतून प्रत्येकी दोन असे एकूण ४० नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रभाग क्र. २ हा अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग ६ हा इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १० इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला या पदांसाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गातून १३ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या १३ जागांवर संधी मिळण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू झाले आहे. यामध्येही निवडणुका मनोमिलनाच्या माध्यमातून झाल्यास सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन आघाड्यांमध्ये तेरा पदांचे वाटप करावे लागणार आहे. नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडायचा असता तर प्रभाग क्रमांक २, ६, ७, ९, १०, १३, १४ या प्रभागांतील आरक्षित पदांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना नगराध्यक्षपदावर संधी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यातूनही आघाडी प्रमुखांनी ठरविल्यास आरक्षित उमेदवारांना हे पद मिळू शकले असत; परंतु खुल्या गटातील उमेदवारांचा रोष पत्करावा लागला असता. आरक्षण बदलले गेले तर मात्र ठराविक प्रवर्गाच्या व्यक्तिला नगराध्यक्षपद मिळू शकते. शहरातील प्रभाग ५, ६, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २० या प्रभागांमध्ये दलित नेतृत्वच अस्तित्वात राहणार नाही. दलित नेतृत्वाला शहराच्या सर्वच भागांतून समान संधी दिली जाणार नाही, हे हे जरी खरे असले तरी नगराध्यक्षपदावर त्यांना संधी मिळू शकणार आहे. संपूर्ण शहरावर प्रभाव असणारा व्यक्तीच नगराध्यक्ष बनणार आहे. (प्रतिनिधी)