शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:20 IST

महसूल विभागातील कारकून पदे त्वरित भरावीत या मागणीसह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे.

सातारा : महसूल विभागातील कारकून पदे त्वरित भरावीत या मागणीसह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. या राज्यव्यापी संपामुळे चौथ्या दिवशी महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले.जिल्ह्यासह राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संपाचा आज चौथा दिवस आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी तसेच तहसील कार्यालय मधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. ठराविक कर्मचारीच कामावर दिसतात. परंतु महसूल आस्थापनेवर असणारे ५५० कर्मचारी हे संपावर गेले आहेत.आज, गुरुवारी मंत्रालयात याप्रश्नी चर्चा होणार होती, काही कर्मचारी मुंबईत दाखल झाले होते. संघटनेचे पदाधिकारी मुंबईला गेले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र एकही कर्मचारी कामावर हजर नाही. प्रतीक कार्यालयामध्ये तहसीलदार प्रांताधिकारी असे वरिष्ठ अधिकारीच काम करताना पाहायला मिळते.राज्यात महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका महसूल सहायकाकडे दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसूल सहायक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे दिसून येते.शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक दहा मे २०२१ अन्वये नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढले आहे. परंतु, अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्याय करत असल्याने हे पत्र तत्काळ रद्द करण्यात यावे, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर