शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सरकारचे खरे रुप जनतेसमोर उघड

By admin | Updated: July 4, 2015 00:03 IST

चव्हाण : मसूरला मेळावा; बाजार समितीची निवडणूक आघाडीतून लढण्याचे दिले संकेत

मसूर : सोशल मीडियाचा वापर करून सत्तेवर आलेल्यो भाजपा सरकारचे खरे रूप जनतेपुढे येऊ लागले आहे. हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार चालला असून, केंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांच्या बनावट पदव्या व बाहेर पडत असलेले विविध घोटाळ्यांचे आरोप होऊन अठरा दिवस उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही ‘ब्र’ शब्द काढला नाही. माझ्या पक्षातील मंत्री दोषी नाहीत, हे म्हणण्याची ताकद मोदींच्याकडे नाही, हे मोठे दुर्दैव आहे. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीने गत पाच वर्षांत उत्कृष्ट कारभार केला असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत आघाडी होणार असल्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.मसूर, ता. कऱ्हाड येथे कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार आनंदराव पाटील, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे, धैर्यशील कदम, नंदकुमार डुबल, बाळासाहेब साळुंखे, मारुती जाधव, सुनील पाटील, जितेंद्र भोसले, अमित जाधव, सुदाम दीक्षित, डॉ. शंकरराव पवार, प्रतिभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारमध्ये पदवी चोरणारी माणसे मंत्रिमंडळात असून, खुद्द शिक्षणमंत्र्यांचीच पदवी बनावट आहे. हे मोठे दुर्भाग्य आहे. परदेशातून काळा पैसा देशात आणू, असे म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारने एकवीस हजार कोटींचा देशद्रोह केलेल्यांना पाठिंबा देत मौन का पाळले आहे. सोळा महिन्यांत सोळा देशांना भेटी देणारे मोदी हे पहिले पतंप्रधान आहेत. देशातील माल निर्यात करायचा सोडून बाहेरचे उद्योग आयात करून भारतातील उद्योगपतींना देशोधडीला लावण्याचा उद्योग सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सात देशाला भेट देऊन आले. शिक्षणंमत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या शपथ पत्रात पदवी लिहिली आहे. त्यांनी बारावीनंतर कोणता तरी कोर्स मान्यता नसलेल्या संस्थेतून केला आहे. सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. कऱ्हाड बाजार समितीचे पाच वर्षांत चांगला कारभार केला आहे. निवडणुकीसंदर्भात योग्य ती निर्णय घेतला जाईल. राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, मरगळ झटकून निवडणुकांना ताकदीने समोर जावा,’ असे आवाहन केले.यावेळी आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, सुरेश घोलप, जितेंद्र भोसले, जयसिंग जाधव, वसंत पवार, यांची भाषणे झाली. गोल्डन पवार यांनी सूत्रसंचालन केले. उमेश साळुंखे यांनी आभार मानले. मेळाव्यास कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीतचुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. ऊस तसेच दूध उत्पादक व दुष्काळग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा केवळ अश्वासनच ठरले आहे. ऊस व दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत. ई-टेंडरमधून पारदर्शकता येत आहे, तरी ही ई-टेंडरशिवाय २०६ कोटींची खरेदी कशी झाली याचे स्पष्टीकरण दिले नाही. असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.