कोपर्डे हवेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डे हवेली येथील प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी धडपडत आहे. गावातील काही युवक पुण्यामध्ये नोकरी व्यवसायासाठी आहेत. त्यांचा या लढ्यात मोठा सहभाग आहे. त्यासाठी पुण्याहून कोपर्डे हवेलीचे सुपुत्र डॉ. सचिन चव्हाण यांनी योग मार्गदर्शन शिबिरामध्ये निवेदकाची भूमिका बजावली, तर योगाचे अभ्यासक डॉ. अमोल पाटील यांनी पहाटे योगांचे मार्गदर्शन केले.
दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात अशी योगाची वेळ होती. त्यातील शेवटची पाच मिनिटे कोरोनाविषयी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉ. वैभव चव्हाण, डॉ. कुमार चव्हाण, डॉ. रोहित चव्हाण, डॉ. अभिषेक चव्हाण यांचा समावेश होता. त्यामध्ये योग आणि आजाराची कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी लोकांच्या मनातील प्रश्न निवेदकाच्या भूमिकेत प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांनी विचारले. गावातील योगाचे मार्गदर्शन पाहण्याचे प्रबोधन ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, शिवाजी चव्हाण, गणेश चव्हाण, दादासाहेब चव्हाण, विजय चव्हाण, शुभम चव्हाण, विवेक चव्हाण, किशोर साळवे, मारुती चव्हाण, सागर साळवे आदींनी केले.
चौकट
गावातील योद्धा ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत अनेक रुग्णांना दवाखान्यात कोरोना सेंटरमध्ये दाखल करत आहेत. गावातील डॉ. कोरोनाच्या आजाराविषयी रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतात. प्रत्येक क्षेत्रातील घटक गावासाठी आणि गावातील ग्रामस्थांसाठी योगदान देत आहेत.