दर वाढताच कांद्याचा घमघमाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:31 PM2017-11-21T23:31:25+5:302017-11-21T23:32:37+5:30

Onion prices go up ... | दर वाढताच कांद्याचा घमघमाट...

दर वाढताच कांद्याचा घमघमाट...

Next


लोणंद : लोणंद कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांद्याची आवक फक्त ७४० पिशव्यांची झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर ३४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत तेजीत गेले आहेत. कांद्याची आवक रोडावलेली असल्याने दर ३४०० रुपयांवर गेले असल्याने कांदा उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळताना ग्राहकांना मात्र तो रडवताना दिसत आहे. कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याने कांदा काढणीस आलेले कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणताना दिसत आहे.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी-विक्रीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खंडाळा, फलटण, माण, कोरेगाव, वाई, भोर, पुरदंर, बारामती आदी तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस उत्पादक शेतकरी आणतात. लोणंद परिसरात पिकणाºया दर्जेदार कांद्यामुळे या देशभरात नावलौकिक आहे. चवीला चांगल्या असलेल्या लोणंद बाजार समितीमध्ये येणाºया या कांद्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे. कांदा हे नाशवंत पीक असून, उन्हाळ्यात शेतकºयांनी साठवलेला गरवा कांदा सप्टेंबर-आॅक्टोबरपर्यंत मार्केटला पुरतो; पण उन्हाळी कांदा फक्त महाराष्ट्र राज्यातच पिकतो. त्यामुळे सप्टेंबरनंतर नवीन हळवा कांदा बाजार येईपर्यंत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढून कांदा ग्राहकांना चांगलाच रडवतो.
महाराष्ट्राबरोबरच भारत देशात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात कांदा पिकतो. मात्र यंदा अवेळी व उशिरा पडलेला पाऊस, खराब हवामानाचा सर्वत्रच कांदा पिकास फटका बसला असून, कांदा उत्पादक भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे बाजार समितीमधील कांद्याची आवक चांगलीच रोडावलेली दिसत आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांद्याची गुरुवारी आवक फक्त ७४० पिशव्या झाली असून, कांद्याचे दर ३४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत तेजीत निघाले आहेत. राज्यात कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद बाजार समितीमध्ये देखील कांद्याची आवक मात्र अद्यापपर्यंत चांगली होत नाही. मात्र कांद्याचे दर ३ हजार ४०० रुपयांवर गेले असल्याने कांदा उत्पादकाना अनेक महिन्यांनी चांगले दिवस आले आहेत. कांद्याला भाव मिळत आहे; पण हाच कांदा ग्राहकांना मात्र चांगलाच रडवताना दिसत आहे.
कांदा वाळवून आणण्याचे आवाहन...
लोणंद बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत आहे. कांदा काढणीस आलेले कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणताना दिसत आहे. गुरुवारी लोणंद बाजार समितीमध्ये गेल्या गुरुवारी ७४० कांदा पिशव्यांची आवक झाली असून, कांद्याचे दर कांदा नंबर १-२४०० ते ३४००, कांदा नंबर २-१००० ते २४००, गोल्टी कांदा ८५० ते १००० रुपये असे निघाले आहेत. लोणंद बाजार समितीमध्ये शेतकºयांनी कांदा चांगला वाळवून प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.

Web Title: Onion prices go up ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती