शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

साताऱ्यात दोघा बाधितासह एका संशयिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:35 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर सुरू असून, बाधित आणि बळींचाही आकडा झपाट्याने वाढू लागलाय. गुरुवारी सातारा शहरातील दोन कोरोना बाधितासह एका संशयिताचा मृत्यू झाला. तर नवे ८० बाधित रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देसाताऱ्यात दोघा बाधितासह एका संशयिताचा मृत्यूनवे ८० बाधित ; बळी ४८, पॉझिटिव्ह संख्या १,१८७

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर सुरू असून, बाधित आणि बळींचाही आकडा झपाट्याने वाढू लागलाय. गुरुवारी सातारा शहरातील दोन कोरोना बाधितासह एका संशयिताचा मृत्यू झाला. तर नवे ८० बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा १ हजार १८७ तर बळींचा आकडा ४८ वर पोहोचला आहे. दरम्यान, १४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण दुप्पट वाढले आहेत. तर बळींची संख्याही तितक्याच गतीने वाढत आहे. त्यामुळे सातारा जिल्हा अक्षरश: हादरून गेला आहे. साताऱ्यातील गुरुवार पेठेतील ५४ वर्षीय महिलेचा आणि रविवार पेठेतील ४९ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित ५४ वर्षीय महिलेस तीव्र मूत्रपिंडाचा आजार व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच ४९ वर्षीय पुरुष कोल्हापूर येथून प्रवास करून आला होता. त्यांना अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच लिंब, ता. सातारा येथील ५६ वर्षीय पुरुषाचाही जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. कोविड संशयित म्हणून त्यांचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिवसभरात ४३९ जणांचे नुमनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.दरम्यान, नव्या ३८ बाधितांमध्ये सात तालुक्यांतील रुग्णांचा समावेश आहे. तसेच रात्री उशिरा यात आणखी ४२ रुग्णांची भर पडली. या रुग्णांचा अहवाल मात्र, शुक्रवारी सकाळी जाहीर केला जाणार आहे.गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील चव्हाण आळीमधील २० वर्षीय युवक, ५० वर्षीय महिला, शिंदेवाडीतील ३६ वर्षीय पुरुष, २१ आणि ३० वर्षीय युवक तसेच शिरवळमधील २८ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.कऱ्हाड तालुक्यातील तारुखमधील ७० वर्षीय पुरुष, आगाशिवनगरातील मलकापूरमधील २४ आणि ३२ वर्षीय युवक, मलकापुरातील २९ वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील २६ वर्षीय युवकाचाही कोरोना बाधित अहवाल आला.वाई तालुक्यात एकूण १४ रुग्ण बाधित आढळून आले. त्यामध्ये सोनगीरीवाडीतील धोम कॉलनीतील ५८ वर्षीय पुरुष, ११ वर्षीय मुलगा, २७ वर्षीय युवक आणि ५५ वर्षीय महिला, ब्राह्मणशाहीतील ७२ वर्षीय पुरुष तसेच ४ वर्षीय बालक, २७ वर्षीय महिला, ८ वर्षीय बालिका, सोनजाई विहार बावधन नाका येथील १६ वर्षीय मुलगी, २० वर्षीय युवती आणि ४० वर्षीय महिला, खानापूरमधील २७ वर्षीय पुरुष तसेच ४९ वर्षीय महिला, शिरगावमधील ३१ वर्षीय युवकाचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारा शहर आणि उपनगरातही आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.शाहूनगरमधील २० वर्षीय युवक, सातारा तालुक्यातील जैतापुरातील ३० वर्षीय युवक, सातारा शहराचे उपनगर असलेल्या जरंडेश्वर नाका येथील ४८ वर्षीय महिला तसेच संगमनगरमधील १४ वर्षीय मुलगी, खावलीतील ४६ वर्षीय पुरुष, करंजेमधील ४० वर्षीय पुरुष, अपशिंगेतील १८ वर्षीय युवकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

कोरेगाव तालुक्यातील तडवळेतील ३४ वर्षीय महिला आणि ६ वर्षीय बालिकेसह पाटण तालुक्यातील कोयनानगरमधील ५५ वर्षीय पुरुष, काजरेवाडी, खाले येथील ३५ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाली. तसेच फलटण तालुक्यातील घाडगेवाडीतील ५८ वर्षीय पुरुष आणि खटाव तालुक्यातील कातरखटावमधील २२ वर्षीय पुरुषाचाही अहवाल कोरोना बाधित आला.जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार १८७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ७५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या ३४० बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.बाधितांमध्ये २५ पुरुष अन् १३ महिलानव्या ३८ बाधितांमध्ये २८ निकट सहवासित , प्रवास करून आलेले ६, सारी १, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग) २, आरोग्य सेवक १ असे एकूण ३८ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये २५ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर