शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामात अडथळ्याप्रकरणी एकावर गुन्हा : कठापूर येथील संशयित फरारी, जेसीबी, डंपर पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 21:40 IST

याबाबत तलाठी अंकुश लक्ष्मण घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तलाठी अंकुश घोरपडे व कोतवाल बक्शुद्दीन भालदार हे गावातील रामोशी वस्तीवरून जात असताना गट नंबर ७०१ मध्ये मुरूम उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले.

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे अवैध मुरूम उत्खनन सुरू होते. कारवाईसाठी तलाठी गेल्यानंतर जेसीबी व डंपर पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला आहे.

संतोष निवृत्ती केंजळे (रा. कठापूर, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत तलाठी अंकुश लक्ष्मण घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तलाठी अंकुश घोरपडे व कोतवाल बक्शुद्दीन भालदार हे गावातील रामोशी वस्तीवरून जात असताना गट नंबर ७०१ मध्ये मुरूम उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. विना नंबरप्लेटच्या जेसीबीने मुरूम उत्खनन सुरू होते. मुरूम वाहतुकीसाठी शेजारी डंपर (एमएच ११ एएल ७८२१) हा उभा केला होता. त्या ठिकाणी उभा असलेल्या संतोष केंजळे याला मुरूम उत्खननाच्या शासकीय परवान्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे त्याने सांगितले. तलाठ्यांनी या उत्खननाचा पंचनामा करून ही वाहने तहसील कार्यालय कोरेगाव येथे घेऊन येण्याबाबत सूचना केली. मात्र, संतोष केंजळे याने वाहनचालकांना वाहने कोरेगावला नेऊ नका. जेसीबी व ट्रॅक्टर आपल्या वस्तीवर घेऊन चला, असे सांगितले. तसेच तलाठी यांच्याकडे पाहून तुम्हाला काय करायचेय ते करा मी बघून घेतो. अशा भाषेत दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तलाठी अंकुश घोरपडे यांनी याबाबतची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.संशयित आरोपीला पकडण्यासाठी रहिमतपूर पोलिसांची टीम पाच दिवसांत दोनवेळा कठापूर येथे गेली होती. मात्र, संशयित आरोपी सापडला नसल्याने फरार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ करत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsandवाळू