शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?, फलटणमध्ये एकाचा खून; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 16:34 IST

‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात केली तलवार, लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण

फलटण : ‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात सहाजणांनी पवार गल्ली, फलटण येथील निलेश चव्हाण व भरत फडतरे यांना तलवार, लोखंडी पाइप व  लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. यामध्ये निलेश चव्हाण मयत झाला असून, सहाजणांच्या विरोधात खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, फलटण येथे श्रीराम मंदिराजवळ, श्रीराम पोलीस चौकीसमोर काल, बुधवार, (दि.१२) रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास निलेश हिरालाल चव्हाण (छोटा मचली) व त्याचा मित्र भरत फडतरे (रा. मलटन, फलटण) यांना ‘आमच्या गल्लीतील मुलींची छेड का काढतो?’ असे म्हणून सलिम शेख यांनी लोखंडी तलवारीने तर त्यांची मुले सैफुला सलिम शेख व जमिर सलिम शेख (सर्व रा. कुंभारटेक, फलटण) यांनी लोखंडी पाईपने तर बिलाल व राज बागवान आणि एक अनोळखी इसम यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देवून, गंभीर जखमी केले. या मारहाणीत निलेश चव्हाण हा उपचार सुरू असताना मयत झाला आहे. तसेच भरत फडतरे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची फिर्याद मयत निलेशची आई कांता हिरालाल चव्हाण यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक भारत केंद्रे तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणCrime Newsगुन्हेगारी