शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

टोल मागितल्याने कर्मचाऱ्यावर गोळीबार एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 14:41 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील आनेवाडी टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या कारणावरून पुण्यातील टोळीने दहशत माजवून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली असून, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला. जखमी कर्मचाऱ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देआनेवाडी टोलनाक्यावरील मध्यरात्रीची घटना पुण्यातील टोळीला शोधण्यासाठी पथके रवाना

भुईंज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील आनेवाडी टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या कारणावरून पुण्यातील टोळीने दहशत माजवून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली असून, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला. जखमी कर्मचाऱ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनेवाडी टोल नाक्यावर रविवारी रात्री एक वाजता सातारा पुणे हायवेवरील टोल बूथ क्रमांक एक समोर ( एमएच १२ एन. जे. ३०२) हा कार चालक टोल न भरता पळून जात होता. यावेळी या कारला टोल बूथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थांबवले. खेड शिवापूर टोलनाक्यावर आमची पार्टनशिप आहे.त्यामुळे आम्ही टोल देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली.

मात्र, कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरावाच लागेल, असे सांगितले. त्यावरून त्या युवकांनी थांबा तुम्हाला दाखवतो, असे म्हणून कुणाला तरी फोन लावला. त्याचवेळी काहीवेळानंतर विरमाडे बाजूकडून एका अलिशान गाडीतून पाच ते सहा व्यक्ती खाली उतरल्या.

कारमधील युवकांनी आम्हाला मारहाण झाल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे त्यातील एकाने टोल नाका कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र, सुदैवाने गोळी लागली नाही. या प्रकारामुळे भयभीत झालेले कर्मचारी जीव वाचवण्याचे आकांताने सैरावैरा धाऊ लागले.

टोल नाक्यावरील कर्मचारी विशाल दिनकर राजे (रा. लिंब) हे पळताना पडल्याने संबंधितांनी त्यास दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यादरम्यान व्यवस्थापक विकास शिंदे यांनी चोरगे यांच्या हातातील पिस्तूल काढून घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु त्यानंतर संबंधित हल्लोखोर तेथून पसार झाले.घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांनी कर्मचाऱ्यांसह टोलनाक्यावर धाव घेतली.

जखमी विशाल राजे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी पहाटेपर्यंत टोल नाक्यावर तळ ठोकून होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरtollplazaटोलनाका