सातारा : जिल्ह्यात ५६० नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, एका बाधिताचा मृत्यू झाला. सलग तिसऱ्यादिवशी एकाच मृत्यूची नोंद झाली असल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यामध्ये शुक्रवारी १० हजार २०५ चाचण्यांमधून ५६० रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये जावलीत ४, कऱ्हाडात ७८, खंडाळ्यात १९, खटावात ११५, कोरेगावात ६२, माणमध्ये ३९, पाटण १३, फलटण १२४, सातारा ८९, वाई ११ व इतर ६ असे आजअखेर एकूण २ लाख ४१ हजार १०७ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. शुक्रवारी वाईमधील एका व्यक्तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १६७ जणांना घरी सोडण्यात आले असून, १० हजार ३४९ रुग्णांना उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.