शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: मोराच्या शिकारप्रकरणी एक ताब्यात; मृत मोर, लांडोरसह छर्रा बंदूक जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:58 IST

चौकशीवेळी त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली

मलकापूर : मोरासह लांडोरीची शिकार केल्याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. तुळसण-ओंड रस्त्यालगत वनविभागाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत मृत मोर, लांडोर, छर्रा बंदूक दुचाकी जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी दिली.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार कोळे, कासारशिरंबे व म्हासोली वनरक्षक रविवारी रात्रगस्त घालत होते. गस्तीवर असताना तुळसण ओंड रस्त्यालगतच्या शेतामध्ये अंधारात छर्रा बंदुकीचा आवाज आला. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मोर व लांडोर याची शिकार झाल्याचे दिसून आले. त्याठिकाणाहून पळून जात असताना पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपीनी साहित्य व मुद्देमाल जागेवर टाकून तेथून पोबारा केला. त्या ठिकाणी मृतावस्थेतील मोर, लांडोर छर्रा बंदूक, दुचाकी घटनास्थळावरून मुद्देमाल मिळून आला. तो वनविभागाकडून ताब्यात घेण्यात आला.वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे अन्वये गुन्हा नोंद केला आहे. वनविभागाकडील श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता संशयित आरोपी सुधीर सर्जेराव पाटील (रा. उंडाळे, ता. कराड ) याच्या राहत्या घरापर्यंत श्वान पोहचला. त्यामुळे सदर आरोपीस चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. चौकशीवेळी त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्याने दिलेल्या माहितीवरून अमित चौगुले व रवि पावणे (रा. कुंडल ता. पलूस जि. सांगली) या फरार संशयित आरोपींचा पुढील तपास सुरू असून, वनक्षेत्रपाल कराड व कोळे वनपाल तपास करीत आहेत. ही कारवाई सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वनक्षेत्रपाल ललिता पाटील, कोळे वनपाल दिलीप कांबळे, म्हासोली वनरक्षक संतोष पाटील, कासारशिरंबे वनरक्षक दशरथ चिट्टे, कोळे वनरक्षक अभिनंदन सावंत यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.