शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:22 IST

सातारा येथील पोवईनाक्यावर बेकायदा पिस्टल बाळगून फिरत असलेल्या रूपेश संजय वारे (वय २०, रा. कालगाव, ता.कऱ्हाड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जीवंत काडतूसे असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज जप्त केला.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन जीवंत काडतुसेही जप्त

सातारा : येथील पोवईनाक्यावर बेकायदा पिस्टल बाळगून फिरत असलेल्या रूपेश संजय वारे (वय २०, रा. कालगाव, ता.कऱ्हाड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जीवंत काडतूसे असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज जप्त केला.याबाबत अधिक माहिती अशी, कऱ्हाड येथून साताऱ्याकडे येणाऱ्या बसमध्ये एक युवक पिस्टल व काडतूस घेऊन साताऱ्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले. या पथकाने सातारा बसस्थानक येथे मंगळवारी सायंकाळी सापळा लावला. परंतु आरोपी रुपेश वारे हा पोवईनाक्यावरच एसटीतून उतरला.

बस स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये संबधित वर्णणाचा युवक सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी बसस्थानक व पोवईनाका परिसरात शोधाशोध सुरू केली. यावेळी हिरव्या रंगाचा टिशर्ट व निळ्या रंगाची पँट घातलेला तरूण त्यांना पोवईनाका परिसरात दिसला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने संजय वारे असे त्याचे नाव सांगितले. त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतूसे पोलिसांना सापडली. संजय वारे याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिध्देश्वर बनकर, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनिर मुल्ला, विक्रम पिसाळ, विशाल पवार, नीलेश काटकर, पंकज बेसके यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर