शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी साताऱ्यात एक वही-एक पेन अभियान

By सचिन काकडे | Updated: April 8, 2024 18:15 IST

हारफुले घेऊन न येता वही आणि पेन सोबत आणावे व ते अर्पण करून अभिवादन करा

सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन सर्वत्र उत्साहात उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या दृष्टीने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न मुलांच्या मन, मेंदू अन् मनगटात सळसळत ठेवणारा आहे. म्हणूनच यादिवशी ‘एक वही-एक पेन अभियान’ राबवून महामानवास अभिवादन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच साताऱ्यात अनेक वर्षे वास्तव्य राहिले आहे. त्यांचे शालेय शिक्षण येथेच झाले. त्यांच्या मातोश्री भीमाई यांचे निधन ही साताऱ्यात झालेय. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा हे ऋणानुबंध ऐतिहासिक आहेत. १४ एप्रिल रोजी या सर्व ऐतिहासिक घटनांना उजाळा मिळतो. शिवाय महामानवास अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या काेनाकोपऱ्यांतून अनुयायी साताऱ्यात येत राहतात. या महामानवाची ओळख ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ अशी आहे. म्हणूनच दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘एक वही-एक पेन’ या अभियानाच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन केले जाणार आहे. येणाऱ्या अनुयायांनी येताना हारफुले घेऊन न येता वही आणि पेन सोबत आणावे व ते अर्पण करून अभिवादन करावे.जे अनुयायी वही, पेन घेऊन येतील त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे रविवार, दि. १४ एप्रिल रोजी अर्थात जयंतीदिनी सकाळी ९ ते रात्री १२ यावेळेत शैक्षणिक साहित्य स्वीकारले जाईल. शाळाबाह्य मुलांना शाळेत आणावयाचे असेल, त्यांना शिक्षणाची गोडी लावून शालेय शैक्षणिक चळवळ गतिमान करायची असेल तर या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अरुण जावळे यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती