शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घरात चोर शिरल्याचे पाहून वृद्ध दाम्पत्य हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:52 IST

मध्यरात्री घरात चोर शिरल्याचे समोर दिसत आहे. पण चोरट्यांना शिवीगाळ करण्यापलीकडे दाम्पत्याला काहीच करता आले नाही. त्यांच्या डोळ्यांदेखत घरातील १३ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील विलासपूरमध्ये मंगळवारी घडली.

ठळक मुद्देघरात चोर शिरल्याचे पाहून वृद्ध दाम्पत्य हतबल १३ तोळे सोने, एक लाखाची रोकड लंपास

सातारा : मध्यरात्री घरात चोर शिरल्याचे समोर दिसत आहे. पण चोरट्यांना शिवीगाळ करण्यापलीकडे दाम्पत्याला काहीच करता आले नाही. त्यांच्या डोळ्यांदेखत घरातील १३ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील विलासपूरमध्ये मंगळवारी घडली.शहराच्या उपनगरातील विलासपूरमध्ये वसंतराव हणमंत जाधव (वय ७६) हे सेवानिवृत्त शिक्षक हे पत्नीसमवेत राहत आहेत. त्यांची मुले पुणे येथे नोकरीला आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना अचानक जाग आली. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी घरातील तेरा तोळ्यांचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरली होती.

दोन चोरटे जाधव यांच्यापासून काही अंतरावर होते. जाधव यांनी चोरट्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे ते पुढे जाण्यास धजावले नाहीत. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यामुळे चोरट्यांनी ऐवज घेऊन पलायन केले.

घाबरलेल्या जाधव दाम्पत्याने हा प्रकार सकाळ होईपर्यंत कोणालाही सांगितला नाही. सकाळी आठच्या सुमारास त्यांनी पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या आपल्या दोन मुलांना या प्रकाराची माहिती दिली. दुपारी बाराच्या सुमारास मुले पुण्याहून साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जाधव यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडतायत का? हे पोलिसांनी पाहिले; मात्र पोलिसांना काहीही सापडले नाही. या चोरीच्या प्रकारामुळे वृद्ध दाम्पत्य घाबरून गेले आहे. विलासपूरमधील काहीजणांच्या घरासमोर असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर