शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

अधिकाऱ्यांच्या कानी ‘टोलमुक्ती गीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:24 IST

सातारा : महामार्गावरील असुविधा व्हिडीओ गीताच्या स्वरुपात व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर असलेले हे गीत अधिकाऱ्यांच्या कानी पडावे, यासाठी ...

सातारा : महामार्गावरील असुविधा व्हिडीओ गीताच्या स्वरुपात व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर असलेले हे गीत अधिकाऱ्यांच्या कानी पडावे, यासाठी टोलविरोधी जनता चळवळीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अधिकाºयांकडे जाऊन हे गीत त्यांना दाखवून महामार्ग असुविधांची तीव्रता दर्शविण्यात येत आहे.महामार्गावरील असुविधांविरोधात आवाज उठविण्यासाठी सोशल मीडियावर ‘टोल विरोधी जनता’ या नावाने चळवळ सुरू करण्यात आली. या चळवळीने अनोख्या मार्गाने आंदोलन करत प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.टोल विरोधी जनता चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज राज्यकर्त्यांसह प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ‘लोकमत’ आघाडीवर राहिला. यामुळे महामार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.सुरक्षित महामार्ग देण्यासाठी प्रशासन कार्यरत झाल्यानंतर आता चळवळीने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या मागणीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. खड्डेमुक्त महामार्ग करण्याचे काम सर्वत्र सुरू झाल्यानंतर आता महामार्गावरील मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना हे गाणे ऐकवले. या गाण्याच्या चित्रीकरणाचे कौतुक करून राऊत यांनी महामार्ग दुरवस्थेबाबत तातडीने प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.यावेळी रवींद्र नलवडे, महेश महामुनी, महारुद्र तिकुंडे, महेश पवार, रोहित सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.सरकार रस्ता चांगला कर...!टोल विरोधी जनता चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते महेश पवार यांनी ‘सरकार रस्ता चांगला कर नाहीतर टोल बंद कर.. आता उठ सातारकर त्याच्यासाठी तूच काही तर कर’ हे गीत तयार केले आहे. अडीच मिनिटांच्या या गीतात पुणे- सातारा महामार्गावरून प्रवास करणाºयांच्या यातना कथित करण्यात आल्या आहेत. या गाण्याचा व्हिडीओही सध्या व्हायरल झाला असून, तोही समाज माध्यमांत चांगलाच पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये सामान्य सातारकरांनी भूमिका बजावल्या आहेत.