शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: काम एकाचे, घेऊन आला दुसराच; कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्याला अधिकाऱ्यांनी सुनावले

By नितीन काळेल | Updated: October 12, 2023 18:59 IST

यानंतर मात्र, संबंधितांनी विभागातून काढता पाय घेतला

सातारा : जिल्हा परिषदेत दुसऱ्याचे काम घेऊन येणाऱ्याने कर्मचाऱ्याशी उध्दटपणा केला. तसेच बराचवेळ हुज्जत घातली. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी चमकोगिरी करणाऱ्याला चांगलेच सुनावले. यानंतर मात्र, संबंधितांनी विभागातून काढता पाय घेतला.याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील एकजण सातारा जिल्हा परिषदेतील एका विभागात कामासाठी आला होता. संबंधित खंडाळा तालुक्यातील एकजणाचे काम घेऊन आला होता. त्याने जिल्हा परिषदेतील संबंधित विभागात जाऊन कर्मचाऱ्याकडे कामाबाबत सांगितले. यावर कर्मचाऱ्याने योग्य उत्तर दिले. मात्र, संबंधित व्यक्ती वारंवार हुज्जत घालत होती. हा सर्व प्रकार इतर कर्मचारी तसेच कामासाठी आलेले नागरिकही पाहत होते. बराचवेळ संबंधितांकडून हा प्रकार सुरू होता. विभागातील कर्मचाऱ्याबरोबर हुज्जत आणि अरेरावी सुरू असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांना समजला. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यातून आलेल्या संबंधिताला चांगलेच सुनावले. त्यामुळे संबंधित व्यक्ती चांगलीच वरमली. त्यानंतर संबंधिताने जिल्हा परिषदेतून काढता पाय घेतला. दरम्यान, जिल्हा परिषदेतील या प्रकाराची दिवसभर चर्चा सुरू होती. असे असलेतरी कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणाऱ्याला सुनावल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याला कर्मचारी संघटनांच्यावतीने धन्यवाद देण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद