शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रेमींकडून रायरेश्वरावर शपथ, स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 16:18 IST

Swachh Bharat Abhiyan, Satara area, Fort छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या श्री रायरेश्वरावर घेतली त्याच रायरेश्वरावर स्वच्छता मोहीम  राबवून प्लास्टिकच्या कचऱ्याच्या शपथ घेत वाई व सातारा येथील छत्रपतीचे सेवक गृपच्या पन्नास सदस्यांकडून सुमारे १० पोती कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवप्रेमींकडून रायरेश्वरावर शपथ, स्वच्छता मोहीमदहा पोती कचऱ्याचे संकलन : पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या श्री रायरेश्वरावर घेतली त्याच रायरेश्वरावर स्वच्छता मोहीम  राबवून प्लास्टिकच्या कचऱ्याच्या शपथ घेत वाई व सातारा येथील छत्रपतीचे सेवक गृपच्या पन्नास सदस्यांकडून सुमारे १० पोती कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. श्री रायरेश्वरावर आज प्लास्टिकच्या कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. सुट्यांचे दिवस असले की श्री रायरेश्वर येथे गडावर फिरायला येणाऱ्या पर्यटककांडून प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्य पदार्थांचे प्लास्टिक कागद, पाण्याच्या, शीत पेयाच्या मोकळ्या बाटल्या बेजबाबदारपणे फेकल्या जातात यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते.

घाणीमुळे पठारावर अस्वच्छता पसरलेली होती. त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींचे सेवक गृपच्या सदस्यांनी श्री रायरेश्वर येथे स्वच्छता मोहीम राबिवली. या मोहिमेत सदस्यांसह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

यावेळी श्री महादेव मंदिर परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. नंतर गोमुख कुंड परिसर, मंदिरापासून ते शिडीपर्यंतच्या मार्गातील सर्व कचरा उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. या मार्गामध्ये सुमारे १० पोती कचरा संकलित करण्यात आला.

वाई व सातारा येथील छत्रपतीचे सेवक गृपच्या निवृत्ती पाटील, अक्षय शिंदे, अतुल चव्हाण, गणेश गुजर, राहुल जाधव, रोहित चव्हाण, कुशल निंबाळकर, स्वप्निल शिंदे, कोमल संकपाळ, काजल संकपाळ, संतोष शिंदे यांनी पन्नास सदस्यांसह ग्रामस्थांनी रायरेश्वराव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

ऐतिहासिक वस्तूंचे पावित्र्य राखणे आपले आद्य कर्तव्य आहे. गडकिल्ल्यावर गेल्यावर प्रत्येकाने स्वयंआचार संहिता पाळली पाहिजे. परिसरात अस्वच्छता दिसल्यास स्वच्छता करून पावित्र्य राखले पाहिजे.- निवृत्ती पाटील, सदस्य कृष्णाई सोशल फोरम वाई

 

 

वाई येथील शिवप्रेमींकडून रायरेश्वरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

टॅग्स :FortगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर