शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५० हजार पार, नवीन २२४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 11:47 IST

coronavirus, satara #Hospital सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळू-हळू वाढत असून सोमवारी नवीन २२४ रुग्णांची नोंद झाली. यामुळे बाधित आकडा ५०१०३ झाला. तर कोरोनाने दोघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १६८३ झाली आहे. कोरोनावर मात केलेल्या ४९ जणांनी घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ४७१२२ मुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५० हजार पार, नवीन २२४ रुग्ण कोरोनाने दोघांचा मृत्यू; बळींचा आकडा १६८३

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळू-हळू वाढत असून सोमवारी नवीन २२४ रुग्णांची नोंद झाली. यामुळे बाधित आकडा ५०१०३ झाला. तर कोरोनाने दोघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १६८३ झाली आहे. कोरोनावर मात केलेल्या ४९ जणांनी घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ४७१२२ मुक्त झाले आहेत.जिल्ह्यात कोरोना बाधित वाढत आहेत. रात्रीच्या अहवालानुसार १४७ नागरिकांचे अहवाल बाधित आले. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील खंडोबाचीवाडी, जकातवाडी, पोगरवाडी, भरतगाववाडी, शिवथर, वेणेगाव, कोंडवे, अतित आदी गावांत नवीन रुग्ण निष्पन्न झाले.

कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी, सैदापूर, उंब्रज येथे तर पाटण तालुक्यात पाटण, कोयनानगर, मोरगिरीत रुग्ण स्पष्ट झाले. फलटण तालुक्यातही फलटण, होळ, तरडगाव, विडणी साखरवाडी, सुरवडी, सोमंथळी, कोळकी आदी गावांत रुग्ण निष्पन्न झाले.खटाव तालुक्यातील वेटणे, सातेवाडी, औंध, मायणी, पुसेगाव येथे, माण तालुक्यात गोंदवले, पळशी, मलवडी, विरळी, म्हसवड आदी गावांत तसेच कोरेगाव, जावळी, वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन रुग्णांची नोंद झाली.मृत सातारा अन् कऱ्हाड तालुक्यातील...जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातील हे मृत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात देगाव (ता. सातारा) येथील ६२ वर्षीय महिला तसेच खासगी रुग्णालयात कऱ्हाड तालुक्यातील ओगलेवाडी येथील ८२ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.३४९ जणांचे नमुने तपासणीला...जिल्ह्यातून दिवसभरात ३४९ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून २८, कऱ्हाड २१, फलटण २४, कोरेगाव ३१, वाई ३६, खंडाळा २८, रायगाव १, पानमळेवाडी येथील ६, मायणी १८, महाबळेश्वर २५, पाटण ९, दहिवडी २२, खावली येथील ५, तळमावले २०, म्हसवड १५ वकऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ६० असे एकूण ३४९ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर