शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक घरांची संख्या अर्धशतकाकडे : रहिमतपूर पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:18 IST

रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी धोकादायक घरांचा आकडा अर्धशतकाकडे गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी २५ इमारती धोकादायक होत्या. त्यामध्ये वाढ होऊन गतवर्षी

ठळक मुद्दे दोन वर्षांत घरांच्या संख्येत वाढ

जयदीप जाधव ।रहिमतपूर : रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी धोकादायक घरांचा आकडा अर्धशतकाकडे गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी २५ इमारती धोकादायक होत्या. त्यामध्ये वाढ होऊन गतवर्षी ३८ इमारती धोकादायक ठरवून संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दरम्यान, रहिमतपूर पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक घरांचा सर्व्हे सुरू आहे.

रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील मोडकळीस आलेली घरे पावसाळ्यात पडल्यास घरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संभावित होणारी दुर्घटना व नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने धोकादायक असलेल्या इमारतीचा सर्व्हे सुरू केला आहे. गतवर्षी ३८ इमारती धोकादायक ठरवून संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. धोकादायक घरात वास्तव्य करणाºया मिळकतदारांना नोटिसा बजावून पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्याची सूचना केली होती.

पावसामुळे दुर्घटना घडल्यास संभावित नुकसानीला मिळकतदार जबाबदार राहतील. त्यामुळे मिळकतदारांनी पर्यायी जागेत तत्काळ स्थलांतर करावे, अशी सूचना मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिल्या होत्या.दरम्यान, बहुतांशी मिळकतदारांना पर्यायी निवासस्थान उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने धोका पत्करून धोकादायक घरातच कुटुंबीयांसह वास्तव्य करावे लागत असल्याचे सर्व्हेदरम्यान दिसून येत आहे.पावसाळ्यात शेजाऱ्यांनाही धोकाधोकादायक घरात राहणाºया बहुतांशी मिळकतदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना घरासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही, काहींची आर्थिक परिस्थिती नाही, काहींच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. त्यामुळे नाईलाजाने अनेक मिळकतदार धोका पत्करून धोकादायक घरात राहत आहेत. त्यांच्याबरोबरच धोकादायक घराशेजारी राहणाºया नागरिकांनाही पावसाळ्यात धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यामध्ये धोकादायक घरांची रात्री-अपरात्री पडझड झाल्यास त्याचा फटका शेजारी राहणाºयांना बसणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने धोकादायक घराबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील शहरात धोकादायक इमारत धोक्याची घंटा ठरत आहेत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका