शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
3
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
4
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
5
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
6
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
7
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
8
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
9
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
10
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
11
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
12
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
13
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
14
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
15
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
16
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
17
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
18
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
19
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
20
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू

..आता ‘खरेदीविक्री’साठी चढाओढ

By admin | Updated: May 19, 2015 00:31 IST

नऊ संघांत रणकंदन : काँगे्रस-राष्ट्रवादीतच चुरस; भाजप-शिवसेनाही घुसण्याच्या तयारीत

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता जिल्हा खरेदीविक्री संघासह जिल्ह्यात आठ तालुका खरेदीविक्री संघाच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हा कार्यक्रम जाहीर केला असून, १५ मे पासून अर्ज दाखल करून घ्यायला सुरुवात झाली आहे. १४ जून रोजी मतदान होणार असून, १५ जून रोजी मतमोजणी होणार आहे. काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून आता चुरस पाहायला मिळत आहे. भाजप-शिवसेनेचे कार्यकर्तेही या सहकारी संस्थांमध्ये घुसण्याच्या तयारीला लागले आहेत.जिल्हा खरेदीविक्री संघासाठी २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये तालुका खरेदीविक्री संघाचे ६, विकास सेवा सोसायट्यांचे ५, दूध उत्पादक व पुरवठा संघाचे २, सहकारी ग्राहक व प्रक्रिया व इतर संस्थांचा १, व्यक्ती भागधारक २, महिला राखीव २, अनुसूचित जमाती १, भटक्या जमाती १, इतर मागास १ अशा जागांचा समावेश आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत श्रीखंडे यांची नियुक्ती झाली आहे. भूविकास बँकेमध्ये त्यांचे कार्यालय राहणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ मे रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. २० रोजी चिन्ह वाटप व २१ रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २२ ते ५ जूनदरम्यान, अर्ज मागे घेता येणार आहे. १४ जून रोजी मतदान होणार असून, १५ रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सातारा तालुका खरेदीविक्री संघाचे १७ संचालक निवडण्यासाठी दि. १४ जून रोजी मतदान होणार आहे. पाटण तालुका खरेदीविक्री संघाच्या १७ संचालक निवडण्यासाठी १५ जून रोजी मतदान होणार आहे. खंडाळ्यात १५ संचालक निवडण्यासाठी १५ जून रोजी मतदान होईल. जावळीत १७ संचालक निवडण्यासाठी १४ जूनला मतदान होईल. वाईत १७ संचालक निवडण्यासाठी १५ जून रोजी मतदान होईल. खटावमध्ये १७ संचालक निवडण्यासाठी १४ जूनला मतदान होईल. फलटणमध्ये १७ संचालक निवडण्यासाठी १३ ला मतदान होईल. कोरेगावमध्ये १५ संचालक निवडण्यासाठी १४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक ठिकाणी मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. गृहनिर्माण मतदारसंघाच्या १३ जागांसाठी १४ जून रोजी मतदान केले जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी या मतदारसंघाचे नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले करत आहेत. साहजिकच या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली केल्या जातील. इतर खरेदी विक्री संघातही विरोधकांअभावी निवडणुका बिनविरोध होण्याची चिन्हे आहे. (प्रतिनिधी)विरोधकांच्या भूमिकेकडे लक्षजिल्ह्यातील खरेदी विक्री संघांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. यासह इतर सहकारी संस्थांमध्ये असणाऱ्या सत्तेच्या आधारावरच राष्ट्रवादीचे राजकारण बळकटपणे चालते. या राजकारणाला शह द्यायचा असेल तर प्रथम याठिकाणी शिरकाव करण्याची गरज आहे, हे ओळखून काँगे्रससह शिवसेना, भाजप हे विरोधकही तयारीला लागले आहेत. विरोधात का होईना पण निवडून जायची तयारीही काहींनी केली आहे. आता विरोधक कितपत तयारी करतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. डीसीसी बँकेच्या निवडणुकीतही काहींनी रणशिंग फुंकले होते. पण ऐनवेळी अनेकांनी शेपूट घातले होते.