शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

घोटातला घोट आता पदपथावरच्या झाडांना!

By admin | Updated: May 27, 2016 21:57 IST

राजपथावर सौंदर्य : साताऱ्यातील मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ-मोरगाव गु्रपचा पथदर्शी प्रकल्प-लोकमत जलमित्र अभियान

सातारा : तीव्र उन्हाळ्याच्या झळा सोसताना आता पाणीटंचाईचा प्रश्न नव्याने सर्वांपुढे आ वासून उभा आहे, याच प्रश्नावर उत्तर शोधताना येथील मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव गु्रप यांच्या वतीने राजपथावर मोती चौक ते मारवाडी भवन या परिसरात पाम व फायकस या झाडांची कुंड्यांमध्ये लागवड केली आहे. या कुंड्यांमुळे हा परिसर आणखी सुंदर तर झाला आहेच, त्यासोबत पाणी बचतीचा एक पथदर्शी प्रयोग राबविला गेला आहे. राजपथावर मोठी व्यापारी पेठ आहे, हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात वृक्षांची संख्या अत्यल्प आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामध्ये या परिसरात सावलीचा आधारच नसल्याचे अनेकांना लक्षात आला. व्यापारी पेठेत खरेदीसाठी ग्राहकवर्गाची नेहमी लगबग असते. तीव्र उन्हाळ्यामुळे व्यापाऱ्यांनी ग्राहकांना पाण्याची सोय केली आहे; परंतु अनेकदा लोक पाणी पितात आणि भांड्यात उरलेले पाणी रस्त्यावर ओतून देतात, हे लक्षात आल्यानंतर मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव गु्रपच्या कार्यकर्त्यांनी राजपथावर मोती चौक ते मारवाडी भवन या अंतरात पाम व फायकस या दोन प्रकारच्या झाडांच्या तब्बल ३६ कुंड्या ठेवल्या. ‘पिल्यानंतर भांड्यात उरलेले पाणी या झाडांना घाला, पाणी वाया घालवू नका,’ अशी विनंती या व्यापाऱ्यांनी ग्राहकांना काही दिवस केली. मात्र, त्यानंतर झाड पाहिल्यानंतर पाणी रस्त्यावर ओतून न देता, ते झाडाला ओतू लागले. सकाळी फिरायला येणारे लोक तर बाटलीत पाणी घेऊन येतात आणि या कुंड्यांतील झाडांना घालतात. अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मोरेश्वरावर श्रद्धा ठेवून याठिकाणी मोरगाव गु्रप स्थापन झाला. दर चतुर्थीला या गु्रपचे सर्व सदस्य मोरगावला दर्शनासाठी जात असतात. या गु्रपमध्ये २५ वर्षांच्या तरुणापासून ७० वर्षांपर्यंतच्या वृद्धांचाही समावेश आहे. मोरेश्वराच्याच प्रेरणेने या लोकांनी हा परिसर सुंदर केला. पाणी बचतीचा नवा अध्याय निर्माण केला. पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्वत: या ठिकाणाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. पालिका काही दिवसांत ग्रीन सिटीची संकल्पना राबविणार आहे, यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात आम्ही सर्व ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अगदी युवकांपासून ते गृहिणी, छोटे-मोठे व्यावसायिकही ‘जलमित्र’ बनून पाणीबचत करून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत.(प्रतिनिधी)मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव ग्रुप यांच्या वतीने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. देवी चौक ते राजवाडा हा संपूर्ण परिसर हिरवागार करण्यासाठी नगरपालिकेच्या ग्रीन सिटी प्रकल्पाला आमचा कायमच हातभार राहील.- संतोष लुणावत, व्यापारी