शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आता घरबसल्या मिळवा डिजिटल स्वाक्षरीचा दस्त; मुद्रांकच्या ‘ई-प्रमाण’ प्रणालीचा पहिल्या टप्प्यात साताऱ्यात प्रयोग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:10 IST

व्यवहार होणार सुरक्षित

सातारा : मुद्रांक विभागाने ‘ई-प्रमाण’ ही नवी संगणकप्रणाली विकसित केली असून, त्याद्वारे दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी असलेला डिजिटल दस्त आता नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन आणि जुने दस्त घेण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही. सातारा जिल्ह्यात बुधवारपासून पहिल्या टप्प्यात हा प्रयोग सुरू झाला आहे.नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाइटवरील ‘ई-सर्च’द्वारे जुने दस्त उपलब्ध होत होते. मात्र, ते कायदेशीर म्हणून ग्राह्य धरले जात नव्हते. त्याकरिता पुणे शहराचे सहजिल्हा निबंधकांनी डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त उपलब्ध करण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्याच धर्तीवर नोंदणी मुद्रांक विभागाने संगणक प्रणालीत बदल करून ‘ई-प्रमाण’ ही नवी प्रणाली विकसित केली आहे. त्या प्रणालीच्या आधारे आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त असलेल्या दस्तांच्या प्रती नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.या सुविधेमुळे दस्ताच्या प्रत्येक पानावर दुय्यम निबंधकाची डिजिटल सही असले. ‘ग्रीन टीक’ किंवा ‘डिजिटल टीक’द्वारे दस्तांची कायदेशीर मान्यता तपासता येणार आहे.

सेवा पंधरवड्यात नावीन्यपूर्ण उपक्रम‘ई-प्रमाण’ प्रणालीद्वारे नोंदणीकृत दस्ताची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत नागरिकांना घरबसल्या संदेशाद्वारे किंवा ‘लॉग-इन’मध्ये मिळणार आहे. नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाइटवरील ‘ई-सर्व्हिसेस’च्या माध्यमातून अर्जावर आणि आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या सर्व अर्जावर दुय्यम निबंधक हे एकत्रितपणे डिजिटल स्वाक्षरी करणार आहेत. राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रत मिळणार आहे.

व्यवहार होणार सुरक्षितई-प्रमाण या संगणक प्रणालीमुळे दस्त पाठविणाऱ्यास प्रमाणीकरण करता येणार आहे. स्वाक्षरीनंतर दस्तात कोणताही बदल नाही, याची खात्री मिळू शकणार आहे. एन्क्रिप्शन तंत्रज्ञानावर आधारित आणि सुरक्षित व्यवहार होणार आहे.

प्रत्येक पानावर डिजिटल स्वाक्षरीया सुविधेमुळे प्रत्येक पानावर निबंधकाची डिजिटल स्वाक्षरी असेल. ग्रीन टीक किंवा ‘डिजिटल टीक’द्वारे दस्त तपासता येईल. यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कार्बन फूटप्रिंट कमी करून पर्यावरणाला हातभार लागणार आहे. संदेशाद्वारे नागरिकांना डाउनलोड लिंक मिळणार आहे.

एखाद्या मिळकतीचा दस्तऐवज कोणत्या कार्यालयात कोणत्या अनुक्रमांकाने नोंदला आहे, याची माहिती मिळाल्यानंतर त्याची प्रमाणित प्रत नागरिकांना घरबसल्या या सुविधेद्वारे घेता येईल. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज नाही. - संजय पाटील, सह. जिल्हा निबंधक वर्ग १