शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

लोणंद पाठोपाठ खंडाळ्याला आता नगरपंचायतीचे वेध..

By admin | Updated: April 20, 2016 00:25 IST

एप्रिल अखेर अधिसूचना निघण्याची राजकीय वर्तुळात चर्चा

खंडाळा : लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय कधी होणार याचे वेध खंडाळकरांना लागले असून, पुढील रणनीतीसाठी सर्वच पक्ष सज्ज असल्याचे जाणवू लागले आहे. तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर याची घोषणाही विधानसभेत करण्यात आली होती. त्यामुळे एप्रिलअखेर खंडाळा नगरपंचायतीची अधिसूचना निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू होते. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात खंडाळा नगरपंचायत करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार एप्रिल अखेरपर्यंत कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.नगरपंचायतींना महाराष्ट्र रिजनल अ‍ॅन्ड टाऊन प्लॅनिंग कायदा १९६६ लागू होत असतो. त्यामुळे नगरपंचायत क्षेत्राचा झपाट्याने विकास होतो. विशेषत: रस्ते, पाणी योजना, दलित वस्ती विकास, सांडपाणी योजना यांसह पायाभूत सुविधा नागरिकांना पुरविणे सोपे जाते. तसेच नगरपंचायतीसाठी शासनाकडून विशेष निधी पुरविला जात असल्याने निधीअभावी रखडलेली कामे पूर्ण करणे सहजसोपे होते. पुण्यापासून अतिशय जवळचे आणि राष्ट्रीय महामार्गालगत असणारे खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे औद्योगिक विकासही झपाट्याने वाढू लागला आहे. तसेच वाढते नागरिकीकरण, व्यापारी व्यवसाय तसेच कामगार वर्गाचेही राहते प्रमाण वाढू लागले आहे. त्यादृष्टीने खंडाळ्याची नगरपंचायत महत्त्वाची मानली जाते.खंडाळ्याच्या नगरपंचायतीचा निर्णय अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती काय असावी याबाबत प्रमुखांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वास्तविक अधिसूचना जारी झाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये निवडणुका घेणे अपेक्षित असते त्यामुळे राजकीय वर्तुळात यादृष्टीनेही विचार केला जात आहे. (प्रतिनिधी)खंडाळ्याचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर आम्ही त्याचे स्वागतच करू. सत्तेच्या माध्यमातून काँग्रेस नेहमी लोकांच्या संपर्कात असते. त्यामुळे त्यापुढील प्रक्रियेसाठी काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते सज्ज राहतील.- अनिरुद्ध गाढवे, पं.स. सदस्य, काँगे्रस.खंडाळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वागतच करेल. खंडाळ्यात राष्ट्रवादी प्रबळ आहे. त्यामुळे निर्णय झाल्यास आम्ही पुढच्या रणनीतीसाठी योग्य ती रचना करू.- शैलेश गाढवे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी औद्योगिक सेल.खंडाळा नगरपंचायतीचा होणारा निर्णय नागरिकांच्या हिताचा आहे. त्यामुळे शिवसेना त्याचे स्वागतच करेल. कार्यकर्त्यांच्या समन्वयातून आम्ही पुढील प्रक्रियेसाठी तयारी करू. - अजित यादव, तालुकाप्रमुख, युवासेना खंडाळा नगरपंचायत निर्णयाचे भाजपा स्वागतच करेल. सर्वांना बरोबर घेऊन खंडाळ्याचा कायापालट करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांसह सज्ज राहणार आहोत. - अभिजित खंडागळे, विभागप्रमुख , पश्चिम महाराष्ट्र कामगार भाजपा संघटना