शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

पुण्यातील कुख्यात गुंड परवेज शेखला साताऱ्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 15:00 IST

सातारा : पुणे येथील कुख्यात गुंड व खंडणी, खूनाचे गुन्हे दाखल असलेल्या परवेज शेख याला सातारा व पुणे गुन्हे ...

ठळक मुद्देपुण्यातील कुख्यात गुंड परवेज शेखला साताऱ्यात अटकस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तीन पिस्टलसह चाळीस काडतुसे जप्त

सातारा : पुणे येथील कुख्यात गुंड व खंडणी, खूनाचे गुन्हे दाखल असलेल्या परवेज शेख याला सातारा व पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली.

संगम माहुली येथील एका मंदिरात बसलेला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन पिस्टल व चाळीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.याबाबत अधिक माहिती अशी, परवेज हनिफ शेख (रा. गंगानगर, हडपसर) याच्यावर सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असून, सध्या तो पुणे येथे वास्तव्यास आहे. त्याच्यावर पुणे येथील एका व्यापाऱ्याच्या खंडणीसाठी खून केल्याचा आरोप असून पोलीस त्याचा शोध घेत होते.

परवेज हा दि. १७ रोजी साताऱ्यातील संगम माहुली परिसरात आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून परवेज थांबलेल्या संगम माहुली येथील मंदिराची माहिती दिली. त्यानंतर साताऱ्यातील पोलिसांनी संगम माहुली येथे जाऊन परवेजला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर