शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांनी आमच्यावर नव्हे आम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय : सयाजी शिंदे

By दीपक शिंदे | Updated: March 15, 2023 13:03 IST

झाड पाडल्यावर पाच जन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरणात झाडांची कत्तल सुरू आहे. हे पाहून मन कासावीस होते. हातातील सर्व शूटिंगची कामे सोडून ही झाडे वाचविण्यासाठी आलो आहे. जे झाड दोनशे वर्षांपासून किडा, मुंगी, पक्षी यांना आसरा आणि माणसांना ऑक्सिजन देते. ते झाड पाडल्यावर ५ हजारांचा दंड केला जातो. हे लाजिरवाणे असून असे झाड पाडल्यावर पाच जन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, असे मत अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.सयाजी शिंदे म्हणाले, जो माणूस इतर माणसांसाठी किंवा पर्यावरणासाठी काहीही न करता फक्त राजकारण करतो. पाच वर्षे सरपंच असतो. त्याच्या मृत्यूनंतर शेकडो लोक शोक करतात. पण, दोनशे वर्षे जे झाड केवळ इतरांसाठी काम करते. फळे, फुले आणि ऑक्सिजन देते. त्या झाडांना मारले जात असताना कोणालाच कसे काही वाटत नाही. पाच वर्षांच्या राजकारणात इकडचे काम तिकडे करणाऱ्यांना आपण खूप चांगले काम केल्याचे म्हणतो. पण, झाडांनी निरपेक्ष वृत्तीने मनुष्य आणि पशू-पक्ष्यांची केवळ सेवाच केलेली असते. याचा विचार करायला कोणालाच वेळ नाही.ते पुढे म्हणाले, आपल्या घराची भिंत एखाद्याने पाडली तर आपण त्याला कोर्टात खेचतो. एवढी सजगता झाडांच्या बाबतीत दाखवत नाही. पुढारी, सेलिब्रिटी यांच्या मागे धावतो. ते आपल्यासाठी काही करत नाहीत, पण त्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी करतो. मग जी झाडे आपल्याला कायम ऑक्सिजन देऊन जीव वाचवितात त्यांच्यासाठी काय करतो, असा सवालही सयाजी शिंदे यांनी केला.

महामार्गावरील जुनी ३५ झाडे वाचविणारझाडे केवळ कागदोपत्री वाचवून चालणार नाही, तर त्यांचे पुनर्रोपण करणे आवश्यक आहे. महामार्गावरील ३५ जुन्या झाडांचे जवळपास रोपण करण्यात येणार असून शक्य तेवढी झाडे वाचविण्याचा निर्णय सयाजी शिंदे यांनी घेतला आहे.

मधमाशांनी आमच्यावर नव्हे आम्ही त्यांच्यावर हल्ला केलायमहामार्गावरील झाडे वाचविण्यासाठी आलेलो असताना ही झाडे पाडण्यात आली. त्यावर काही मधमाशांची पोळी होती. त्यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर त्या प्रतिकार करणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर हल्ला केलेला नाही तर आम्ही त्यांच्या घरावर हल्ला केल्यामुळे त्यांनी केवळ बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsayaji shindeसयाजी शिंदे