कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये थैमान घातले आहे. मृत्यूशी सामना करत आरोग्य विभाग लढत आहे. विशेषतः कंत्राटी तत्त्वावर घेतलेले कर्मचारी या काळात राबले. आता कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, असे एका बाजुला शासन सांगत असले तरीदेखील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. चौकातल्या चहाच्या टपरीवर याची चर्चा सुरू होती. एकाच संस्थेत कामाला असलेले मित्र गप्पांमध्ये रंगले होते. एक म्हणाला, किती वाईट झाले ते दिवस थांब करूनदेखील या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केलं. तर दुसरा म्हणाला, आपलं काय वेगळं आहे. काम करा, अथवा नका करू, डोक्यावर तलवार टांगतीच राहणार आहे. त्यामुळे कष्टाची सवय आपण मोडायची नाही. नोकरीत मानसन्मान मिळणार नाही. पण दोन वेळच्या अन्नाची भ्रांत राहणार नाही, असं आपल्याला करावे लागेल. या मित्रांच्या चर्चेमुळे श्रमाला प्रतिष्ठा मिळत असल्याची भावना टपरीवाल्याच्या मनात निर्माण झाली.
लय टेन्शन नको... कधीबी घरला जाव लागेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST