शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

नो पार्किंग नव्हे.. डबल पार्किंग

By admin | Updated: December 1, 2014 00:16 IST

वाहन चालकांची शक्कल : रस्त्यामध्येच वाहने लावल्यामुळे वाहतुकीची कोंडी

सातारा : सातारा शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत आहे. नो पार्किंगमध्ये वाहनांवर कारवाई होत आहे. त्यामुळे आता सातारकरांनी यावर पर्याय म्हणून पार्किंगवर पार्किंग अशी शक्कल लढवून दंडात्मक कारवाईतून सुटका करून घेतली आहे.गेल्या तीन-चार वर्षांत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या मानाने बाजारपेठही वाढली आहेत; परंतु पार्किंगसाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने ही वाहने बाजारपेठेत लावताना नो पार्किंगची धास्ती लागून राहते. नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने वाहतूक शाखा क्रेनने उचलून दंडात्मक कारवाई करत असते, त्यामुळे या कारवाईतून बचण्यासाठी वाहनधारक ज्या ठिकाणी पार्किंग आहे, त्याच ठिकाणी पार्किंग करत आहेत. मग पूर्वी गाड्यावर गाडी लावली जात होती. त्यामुळे पार्किंगमधून लावलेले वाहन काढतानाही कसरती सुरू झाल्या आहेत. अनेकांना वाहने सरकावतच पार्किंगमधून वाहने काढावी लागत आहेत.आधीच पार्किंग ठिकाणी जागा मिळणे मुश्किल असते; परंतु सध्या वाहनधारक ‘पार्किंगवर पार्किंग’ म्हणजेच वाहनांपुढे वाहन लावून दंडात्मक कारवाईतून सुटका करून घेत आहेत. त्यामुळे पुढच्या वाहनधारकांची वाहनेही त्याच ठिकाणी अडकून पडतातयेत, याचे कोणाला सोयर ना सुतक. पोवई नाका, राजवाडा, देवी चौक, खणआळी, शेटे चौक, सीटी पोस्ट आॅफिस या ठिकाणी अधिक वाहने पार्किंग केली जातात. मुख्य बाजारपेठेदिवशी भाजी मंडईतही हीच अवस्था आहे. राजपथावरील अनेक व्यावसायिकांनी पार्किंगची व्यवस्था केली नसून पार्किंग क्षेत्रात अतिक्रमणे केल्यामुळे हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याकडे वेळेवर पालिका व वाहतूक पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)नो पार्किंगवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकारच नाही पाहिजे. पार्किंगची सोय करावी, नंतरच दंड करा. नियम मोडला तरी दंड करा; पण नो पार्किंगमध्ये वाहने लावली तर दंड करण्याची प्रथा मोडली पाहिजे. कारण प्रशासनाने आधी पार्किंगची सोय केली पाहिजे आणि ही त्यांचीच जबाबदारी आहे.- महेश कारंजकरवाहतूक ठप्प होते म्हणून वन-वेची संकल्पना अंमलात आणली; परंतु पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. सध्या मुख्य बाजारपेठेत पार्किंगवर पार्किंग लावून निम्मा रस्ता अडविला जात आहे. त्यामुळे याचाही रहदारीवर परिणाम होत असून, याची जबाबदारी मात्र संबंधित प्रशासन घेत नाही.शहरात अनेक नव्याने इमारती होत आहेत. पालिकेला दिलेल्या प्लॅनमध्ये पार्किंगची सोय दाखविली जाते; परंतु प्रत्यक्ष ती सोय नसल्याने आज वाहने रस्त्यावर दिसत आहेत. मुख्य बाजारपेठेत तर नव्याने अनेकांनी शोरुम पार्किंग क्षेत्रालय उघडले आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.- आमान संदे, वाहनधारक