शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ग्राहकच नसल्याने स्ट्रॉबेरी शेतातच पडून ; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:56 IST

शेतकऱ्यांना यंदा सुरुवातीपासून पावसाने अडचणीत आणले आहे. पुन्हा त्यात बदलत्या हवामानाचा फटका, धुके, अवकाळी पाऊस आणि आता कोरोना विषाणूचा झटका बसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे

ठळक मुद्दे कोरोनाचा असाही फटका : तोडही झाली नसल्याने पाचगणीतील उत्पादक अडचणीत

दिलीप पाडळे ।पाचगणी : कोरोनाचा फटका जगभरातील अनेक देशाला बसला आहे. मोठी शहरंही लॉकडाऊन झाली आहेत. माणसं घरात बसली आहेत. त्यामुळे उद्योग जगताला फटका बसत असताना त्यातून स्ट्रॉबेरीही सुटलेली नाही. ग्राहकच नसल्याने पाचगणीत स्ट्रॉबेरी शेतातच पडून आहे. कवडीमोलही दर मिळत नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

याबाबत माहिती अशी की, व्हायरसच्या संसर्गजन्य रागाने सर्वत्र आपले हातपाय पसरले आहेत. सर्वत्र बाजारपेठांत झालेली लॉकडाऊन परिस्थिती व अवकाळी पावसाचा कहर यामुळे स्ट्रॉबेरी हब म्हणून प्रचलित असलेला पर्यटनस्थळांचा महाबळेश्वर तालुका लॉकडाऊन झाला. यामुळे स्ट्रॉबेरीला ग्राहकच मिळत नाहीत. त्यामुळे तोडीविना स्ट्रॉबेरी शेतातच पडून राहिल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, सोसायट्यांनी ही स्ट्रॉबेरी घ्यावी, अशी मागणी होत आहे.कोरोना व्हायरसचा पादुर्भाव अधिकच वाढल्याने पाचगणी, महाबळेश्वर पर्यटनस्थळे लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे नेहमी गजबजलेली पर्यटनस्थळे पर्यटकांविना ओस पडली आहेत. लाल चुटूक फळाला पर्यटक स्थानिक बाजारातून खरेदी करीत होते. त्यात आता सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने स्ट्रॉबेरी स्थानिक बाजारात विकली जात होती.

त्याचबरोबर सोसायटीला घातली जात होती. आता स्थानिक मार्केट बंद झाल्याने व सोसायटी स्ट्रॉबेरी घेत नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. शेतकऱ्यांना यंदा सुरुवातीपासून पावसाने अडचणीत आणले आहे. पुन्हा त्यात बदलत्या हवामानाचा फटका, धुके, अवकाळी पाऊस आणि आता कोरोना विषाणूचा झटका बसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी स्ट्रॉबेरी विकलीच जात नसल्याने स्ट्रॉबेरीची तोड करीतच नाहीत. त्यात सोसायटी घेत नाही, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

कवडीमोल किंमतही मिळेना...

नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चारशे ते पाचशे रुपये दराने विक्री होणारी स्ट्रॉबेरीला आता कवडीमोलही किंमत मिळत नाही.यावर्षी सततच्या संकटांनी शेतकरी मात्र आर्थिक गर्तेत पडणार आहे. 

कोरोनासदृश्य परिस्थितीमुळे स्ट्रॉबेरी तोड होताच झाडांनाच स्ट्रॉबेरी फळ पडून आहेत. स्थानिक मार्केट बंद झाल्याने तसेच सोसायट्याही स्ट्रॉबेरी घेण्यास तयार नसल्याने आम्ही आर्थिक खाईत लोटले जाणार आहोत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. यावर तातडीने शासन स्तरावरून निर्णय होण्याची आवश्यकता आहे.- राजेंद्र कासुर्डे,स्ट्रॉबेरी उत्पादक, पाचगणी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस